सोलापूर जिल्ह्यात गाव तेथे काॅग्रेसची शाखा अभियान राबविणार-डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील
डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी- सर्व तालुका अध्यक्षांनी केली मागणी

डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी- सर्व तालुका अध्यक्षांनी केली मागणी
अकलूज दि.१२ (केदार लोहकरे) आता विश्वासार्हता असलेला एकमेव काँग्रेस पक्ष उरला असल्याने सर्वच कार्यकर्त्यांनी आता तळमळीने प्रयत्न केले पाहिजेत. गाव तेथे शाखा निघाली पाहिजे यासाठी मी पुढच्या आठवड्यापासून प्रत्येक तालुक्याचा दौरा करणारा असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी केले. ते त्यांच्या धवलनगर -शंकरनगर येथील निवासस्थानी झालेल्या सोलापूर जिल्हा काँग्रेसच्या आढावा बैठकीत बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, येत्या सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामध्ये काँग्रेस निश्चीत विजयी होणार आहे फक्त कार्यकर्त्यांनी थोडेसे प्रयत्न करण्याची गरज आहे. लोक स्वतः हून काँग्रेसला मतदान करण्यासाठी संधीची वाट पहात आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक गावा गावात,जिल्हा परिषद, पंचायत समिती, शहरातील प्रभाग निहाय शाखा निघाल्या पाहिजेत. ऐनवेळी इच्छुकांची गर्दी होऊ नये. त्यासाठी त्या त्या गावातील पदाधिकाऱ्यांनी आपापल्या इच्छुक कार्यकर्त्यांची नावे कार्यालयाकडे लवकरात लवकर पाठवावीत. पदाधिकाऱ्यांनी पक्ष बांधणीसाठी आपापल्या जबाबदाऱ्या सांभाळण्याची ही वेळ आहे.असे म्हणत त्यांनी पदाधिकाऱ्यांना प्रोत्साहित केले.
यावेळी प्रत्येक तालुक्यातील अध्यक्षाने आपापल्या तालुक्यातील सध्य स्थितीचा आढावा घेऊन आपण करणार असलेल्या कामाची माहिती दिली.
यावेळी सर्व तालुका अध्यक्षांच्या भाषणातून डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांना माढा लोकसभा मतदार संघातून उमेदवारी द्यावी, तसेच प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले याना विरोधी पक्ष नेते म्हणून नियुक्त करावे अशी मागणी करण्यात आली.
यावेळी मोतीराम राठोड यांची महाराष्ट्र प्रदेश विमुक्त भटक्या जमाती चे प्रदेश महासचिव म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सन्मानीत करण्यात आले.यावेळी ओ बी सी चे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे,गिरीश शेटे,महीला अध्यक्षा शहीन शेख,जिल्हा सरचिटणीस भिमराव बाळगी,वरिष्ठ उपाध्यक्ष सातलींग शटगार,सांस्कृतिक विभागाच्या अध्यक्ष कविता कदम,जिल्हा निराधार निराश्रित चे अध्यक्ष सुरेश हावळे,जिल्हा संघटक रमेश हसापूरे,उपाध्यक्ष आण्णासाहेब इनामदार,आण्णासाहेब शिंदे,किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पाटील,अशोक देवकाते,वसीम शेख, अल्पसंख्यांक अध्यक्ष,दक्षिण सोलापूरचे अध्यक्ष हरीश पाटील,उत्तरचे शालिवाहन माने देशमुख,मोहोळचे सुलेमान तांबोळी,मंगळवेढ्याचे प्रशांत साळे,पंढरपूरचे हनुमंत मोरे,शहराध्यक्ष अमर सुर्यवंशी, करमाळ्याचे गुलाबराव जगताप,बार्शीचे सतीश पाचकुदळे,माळशिरसचे सतीश पालकर,मोतीराम चव्हाण,कांतीलाल राऊत,संग्राम चव्हाण,अक्षय शेळके, चौंडेश्वरवाडीचे सरपंच शिवाजीराव इंगवले देशमुख,जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव मिसाळ,अरुणा बेंजारपे,सुधीर रास्ते,विकास शिंदे, ज्योती कुंभार आदी उपस्थित होते.