आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा : बाबरवस्ती मिरे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन
धोत्रे मल्टीस्टेट हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य जागृतीचा उपक्रम

धीरज गुंड पाटील यांच्या पुढाकारातून बाबरवस्ती मिरे येथे ८२ रुग्णांना मोफत आरोग्यसेवा
माता-भगिनी व ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मोफत आरोग्य तपासणी शिबिराला भरघोस लाभ
आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा मानून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन
मिरे तालुका माळशिरस येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये आरोग्य सेवा हीच ईश्वरसेवा या भावनेतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष श्री. धीरज राजकुमार गुंड पाटील यांच्या आयोजनाद्वारे तसेच धोत्रे मल्टीस्टेट हॉस्पिटल, अकलूज यांच्या माध्यमातून बाबर वस्ती, मिरे येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात गावातील नागरिकांना विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी, उपचार व औषधे देण्यात आली. तसेच शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य सुरक्षा योजनेची सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. या शिबिराचा एकूण ८२ रुग्णांनी लाभ घेतला असून त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्य आरोग्य सल्ला देण्यात आला.
शिबिरादरम्यान उत्कृष्ट रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांचा ग्रामस्थ व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याबाबत जागरूकता मिळाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी श्री. धीरज गुंड पाटील, बाळासाहेब अडसूळ, हसन मुलाणी, मारुती बाबर, हरीदास बाबर, हेमत बाबर, राजेंद्र होळकर, पिंटू मिस्कर, अंगणवाडी सेविका पाटील मॅडम, मुलाणी मॅडम, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबरवस्ती येथील शिक्षक सुनील बामणे सर, अशा राजगुरू मॅडम, शाळा समिती उपाध्यक्ष हसन मुलाणी, स्थानिक ग्रामस्थ, शाळेतील शिक्षक व इतर मान्यवर उपस्थित होते.
या शिबिराचा लाभ बाबरवस्ती, मिरे गावातील माता-भगिनी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी आयोजकांचे व आरोग्य पथकाचे आभार मानले.



