महाराष्ट्र

अकलूज-मोहिते पाटील समीकरण पुन्हा सिद्ध | मतदारांचा विकासावर विश्वास

“अकलूजचा कौल स्पष्ट! नगराध्यक्षपदी रेश्मा आडगळे; महाविकास आघाडीची सत्ता”

अखेर अकलूज नगरपरिषदेच्या चाव्या मोहिते-पाटील यांच्या हातात

महाविकास आघाडीला घवघवीत यश; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे २२, भाजपचे ४ तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे २ उमेदवार विजयी

अकलूज दि. २१ (प्रतिनिधी): आशिया खंडातील एकेकाळी सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या अकलूजचे नगरपरिषदेत रूपांतर झाल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. पॅनल टू पॅनल लढतीत अखेर मतदारांनी मोहिते-पाटील नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या हातात अकलूज नगरपरिषदेच्या चाव्या सोपवल्या आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र विकास सेना या पक्षांचे उमेदवार रिंगणात होते. नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या रेश्मा लालासाहेब आडगळे, भाजपच्या पूजा कोतमिरे, महाराष्ट्र विकास सेनेच्या सुवर्णा साठे, वंचित बहुजन आघाडीच्या उषा कांबळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या दिव्यानी रास्ते या उमेदवार उभ्या होत्या.

अखेर मतमोजणीअंती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या रेश्मा लालासाहेब आडगळे यांनी स्पष्ट आघाडी घेत नगराध्यक्षपद पटकावले. नगरसेवक पदासाठी एकूण २६ उमेदवार निवडून आले असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे २० उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे ४ उमेदवार आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे २ उमेदवार विजयी झाले आहेत.

या निकालातून अकलूज व मोहिते-पाटील यांचे राजकीय समीकरण आजही भक्कम असल्याचे मतदारांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. निवडणूक काळात मोहिते-पाटील यांच्यावर विविध आरोप व टीका झाल्या. मात्र “अकलूजमध्ये मोहिते-पाटील यांची दहशत नाही, तर विकासावरचा विश्वास आहे,” हे मतदारांनी मतदानातून स्पष्ट केले, असे नवनिर्वाचित नगराध्यक्ष रेश्मा लालासाहेब आडगळे यांनी निकालानंतर सांगितले.

या ऐतिहासिक विजयाबद्दल जयसिंह मोहिते-पाटील, मदनसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील, संग्रामसिंह मोहिते-पाटील, सयाजीराजे मोहिते-पाटील, किशोरसिंह माने-पाटील, क्रांतिसिंह माने-पाटील आदींसह मोहिते-पाटील व माने-पाटील परिवाराने अकलूज पंचक्रोशीतील सर्व मतदारांचे शतशः आभार मानले आहेत.

🔹 अकलूज नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले उमेदवार

नगराध्यक्षा :
रेश्मा लालासाहेब आडगळे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

(प्रभागनिहाय विजयी उमेदवारांची यादी.)

१ युवराज दोरकर – राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी

१ वैशाली भोसले – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

२ प्रियंका लखन गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

२ सचिन देशमुख – राष्ट्रवादी काँग्रेस एसपी

३ विशाल मोरे- राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

३ नम्रता राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

४ मोहसीन बाबू शेख – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

४ मंदाकिनी पाटोळे – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

५ रेशमा इकबाल तांबोळी – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

५ सयाजीराजे मोहिते-पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

६ उज्वला विटकर – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

६ पृथ्वीराज अंबुरे – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

७ मृदुला महेश सूर्यवंशी – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

७ क्रांतिसिंह माने-पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

दिपाली संतोष वाघमोडे – भाजपा

८ महेश शिंदे – भाजपा

९ राहुल लोंढे – भाजपा

९ प्रतिभा विलासानंद गायकवाड – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१० मनीषा मोहन तिकोटे – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१० विलास गणपत क्षिरसागर – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

११ नाशिकराव सोनवणे- राष्ट्रवादी काँग्रेस एस.पी

११ शितल परशुराम बंदपट्टे –  राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१२ स्वाती फुले – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१२ शिवतेजसिंह मोहिते-पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१३ नामदेवराव गलांडे – राष्ट्रवादी काँग्रेस एस पी

१३ जयश्री एकतपुरे -भाजपा

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!