महाराष्ट्र

महाळुंग-श्रीपूर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद | बाजारपेठा कडकडीत बंद | मराठा बांधवांनी केला निषेध व्यक्त

रस्त्यावर केले  ठिया आंदोलन | पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

रस्त्यावर केले  ठिया आंदोलन | पोलीस प्रशासनाला दिले निवेदन

श्रीपूर तालुका माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर परिसरातील सर्व मराठा बांधवांनी व त्यांना सहकार्य करणाऱ्या इतर सर्व संघटनांनी श्रीपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रस्त्यावरती सकाळी नऊ वाजता ठिया मांडून आंदोलन केले. यावेळी सर्व मराठा बांधवांनी व इतर संघटनातील कार्यकर्त्यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांनी केलेल्या लाठी माराचे कालपासून राज्यभरात  पडसाद उमटत आहेत. मराठा समाजाकडून विविध प्रकारे निषेध आंदोलने होताना दिसून आली आज श्रीपूर-महाळुंग मध्ये  मराठा समाज बांधव रस्त्यावर उतरून निषेध करताना दिसून आले. 

सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती याला अनुसरूनच श्रीपूर-महाळुंग मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला दिसून येत आहे.  श्रीपूर  शहरातील व परिसरातील सर्व बाजारपेठा कडकडीत बंद  ठेवण्यात आल्या होत्या..  पोलिसांनी आपला बंदोबस्त चोक ठेवला होता. मुख्यमंत्री आणि पोलिसांकडून जनतेला शांतता  राखण्याचे आव्हान केले आहे. 

यावेळी काही मराठा बांधवांनी व इतर संघटनातील बांधवांनी निषेध व्यक्त करण्यासाठी चौकामध्ये भाषणे केली. सर्व समाजाच्या वतीने पोलिसांकडे निषेधाचे निवेदन दिले.  यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे पी.आय.दीपरत्न गायकवाड, पीएसआय स्वाती (सुरवसे) कांबळे मॅडम, एएसआय बाळासाहेब पानसरे, पोलीस कॉन्स्टेबल गायकवाड, व त्यांच्या सर्व पोलीस स्टाफ ने बंदोबस्त चोख ठेवला होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!