महाराष्ट्र

मरावे परी कीर्तिरूपी उरावे,असे प्रेरणादायी कार्य शहीद निवृत्ती जाधव यांचे आहे – डॉ.यशवंत कुलकर्णी

सलामी, श्रद्धांजली, पुरस्कार वितरण, शहीद जवान ज्योत, पदयात्रा, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, 

शहीद निवृत्ती जाधव यांचा स्मृतिदिनी विविध उपक्रमांनी साजरा

श्रीपूर तालुका माळशिरस येथील शहीद इन्स्पेक्टर निवृत्ती जाधव यांचा 15 वा स्मृतिदिन विविध उपक्रमांनी त्यांच्या श्रीपूर येथील स्मारकावरती साजरा करण्यात आला.  त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना, डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी, मरावे परी किर्ती रुपी उरावे, असे सर्वांना प्रेरणादायी कार्य शहीद निवृत्ती जाधव यांचे आहे. असे मनोगत व्यक्त केले.  सकाळी शहीद जवान ज्योत काढून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची भव्य अशी रॅली काढण्यात आली. त्यांच्या वीरपत्नीने बांधलेल्या स्मारकावरील पुतळ्याला मान्यवरांनी सलामी देऊन श्रद्धांजली वाहिली. पोलीस प्रशासनामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे व शिवछत्रपती गणेशोत्सव मंडळ श्रीपूर सेक्शन 9 यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दल, यांना शहीद निवृत्ती जाधव स्मृती गौरव पुरस्कार शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्थेकडून प्रमुख पाहुणे डॉ.यशवंत कुलकर्णी व उपमुख्याध्यापक नवनाथ अधटरावसर यांच्या शुभहस्ते देण्यात आला. 

या कार्यक्रमासाठी अकलूज पोलीस पोलीस स्टेशनचे एपीआय विक्रम साळुंखे,  पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी,  सीआरपीएफचे इन्स्पेक्टर बाळासाहेब पाटील, कामधेनू परिवाराचे संस्थापक डॉ.लक्ष्मण आसबे, एएसआय बाळासाहेब पानसरे, पांडुरंग जाधव, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, नगरसेविका शारदाताई पाटील, नगरसेविका तेजश्री लाटे, ब्रिमा सागरचे नरेश पाठक, भागवत साहेब, शिवाजी रेडे, नामदेव पाटील, मौला पठाण, विक्रम लाटे, औदुंबर कदम, जगदीश इंगळे,  इंजिनीयर सुशील पताळे,  सुनील पताळेसर, प्राचार्य तय्यब डांगेसर, नवनाथ अधटरावसर, सिताराम गुरवसर, प्रा.सुनील गवळीसर, मुख्याध्यापिका सुरेखा अनिल जाधव मॅडम, शंकर यादवसर,  सुरक्षा अधिकारी भागवत पारसे, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय दोरगे, सचिव बाळासाहेब भोसले, माधव साठे, हेमंत पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री चंद्रशेखर विद्यालयचे सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी, संस्थेचे संचालक धर्मेश जाधव, प्रेरणा जाधव, वीरपत्नी सुरेखा जाधव, रवींद्र नाईकनवरे, सारिका नाईकनवरे, सविता नाईकनवरे, तेजस साळुंखे, कविता साळुंखे, पवन नाईकनवरे, स्वाती पारसे, दत्ता नाईकनवरे, रोहित पाटील, राज पाटील,  विनायक खरात, आदित्य जाधव, अनुराग नाईकनवरे शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता गुरव मॅडम यांनी केले व आभार दत्ता नाईकनवरे  यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!