महाराष्ट्र

अकलूजच्या शंकरराव मोहिते महाविद्यालयात रोजगार मेळावा संपन्न

शंकरराव मोहिते महाविद्यालय व आयसीआयसीआय बँक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला एनआयआयटी यांचे वतीने रोजगार मेळावा

संग्रामनगर (केदार लोहकरे) अकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शंकरराव मोहिते महाविद्यालय व आयसीआयसीआय बँक यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला एनआयआयटी यांचे वतीने रोजगार मेळावा संपन्न झाला. 

एनआयआयटी या कंपनीच्या वतीने आयसीआयसीआय बँकमध्ये रिलेशनशिप मॅनेजर (वरिष्ठ अधिकारी) या एकूण ३०० जागासांठी महाविद्यालयामध्ये कँम्पसमध्ये मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय बागडे ,एनआयआयटी च्या अनुश्री जोशी पुणे व सुरेश पाटील अमरावती यांचेसह महाविद्यालय प्लेसमेंट ऑफिसर डॉ.विश्वनाथ आवड व भुगोल विभागप्रमुख डॉ.संतोष गुजर उपस्थित होते. 

शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक संचालक जयसिंह  मोहिते पाटील यांचे मार्गदर्शनाखाली व अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली महाविद्यालयात विविध उपक्रमाचे आयोजन केले जाते.याच धर्तीवर आज या कँम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले होते. 

या मुलाखत प्रक्रियेत निबंध चाचणी,सायकोमेट्रिक चाचणी मुलाखत,आयसीईटी चाचणी (अभियोग्यता चाचणी) अशा विविध पातळ्यावर मुलाखतीचे टप्पे पुर्ण केले जातात अशी माहीती अनुश्री जोशी यांनी दिली.पुढील एक महिनाभर विविध पातळ्यावर हि प्रोसेस चालू राहते असे कंपनीच्या वतीने सुरेश पाटील यांनी सांगीतले. आजच्या या कँम्पस मुलाखतीमध्ये २७५ हून अधीक मुला मुलींनी सहभाग नोंदविला होता.कँम्पस मुलाखतीचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सुरज ननवरे,नागन्नाथ साळवे,रोहित भोईटे,प्रकाश भोसले,प्रतिक फुले व कार्यालयीन अधिक्षक युवराज मालुसरे यांनी प्ररिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!