श्री चंद्रशेखर विद्यालयाचा 10 वी चा निकाल शेकडा ९४.४७ टक्के | श्रीपूर SCV | SSC | 2025
मुलींना मिळाले सर्वाधिक गुण

श्रीपूर प्रतिनिधी
श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय,श्रीपूर मधील इयत्ता १० वी मार्च २०२५ चा शेकडा निकाल ९४.४७ टक्के लागला आहे. प्रशालेमध्ये एकूण २१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते, त्यापैकी २०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच विद्यार्थी
१) कु. मुटेकर श्रावणी ज्योतीराम-९६.४०%
२) कु. घाडगे प्रियदर्शनी संदीप-९५.६०%
३) कु. हासुरे अक्षरा बाहुबली -९५.२०%
४) चि. पवणे सोमनाथ संदीप-९४.२०%
५) चि. आंभुरे कृष्णा दत्तराव-९३.४०%
विद्यालयातील मागासवर्गीयातून प्रथम तीन विद्यार्थी
१) कु. शिंदे हर्षदा राजेंद्र -९१.००%
२) कु. बेंद्रे श्रीहर्षा सचिन – ९०.२०%
३) कु. काळे श्रेया नागनाथ-८८.००%
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ.श्री. रामदास आबासाहेब देशमुख, उपाध्यक्षा व माजी उपसभापती पंचायत समिती माळशिरस सौ शुभांगीताई रामदास देशमुख, सचिव श्री भारत कारंडे, सदस्य श्री यशराज(भैय्यासाहेब) देशमुख, प्राचार्य श्री पां.बा. बनसोडे, पर्यवेक्षक श्री.न.ह.अधटराव, क. महा.प्रमुख श्री सु.मा.गवळी, सं.मान्य पर्यवेक्षक श्री सि.भा.गुरव व प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक- शिक्षकेत्तर सेवक, शिक्षक- पालक संघ कार्यकारणी सर्व अधिकारी व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती कार्यकारणी सर्व अधिकारी व सदस्य यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले.