महाराष्ट्र

जांबुड ८ हजार ब्रास, वाफेगाव ५ हजार ब्रास, उंबरे(वे) ५ हजार ब्रासचा वाळू उपसा होणार

पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते वाळू केंद्राचे उद्घाटन

सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू मिळणार:-पालकमंत्री विखे पाटील ,जांबुड येथे शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन.

नव्या वाळू धोरणानुसार प्रति ब्रास ६०० रुपयांनी वाळू उपलब्ध

श्रीपुर/प्रतिनिधी : जांबुड ( ता माळशिरस ) महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करून देण्याकरिता वाळूचे उत्खनन साठवून व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे आता सर्व सामान्य नागरिकांना माफक दरात वाळू मिळणार आहे असे मत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले ते जांबुड येथे शासकीय वाळू विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

पुढे बोलताना विखे-पाटील म्हणाले की गेल्या अनेक वर्षापासून जिल्हात बंद असलेल्या वाळू उपशाला अखेर शासनाकडून परवानगी मिळाली आहे माळशिरस तालुक्यातील वाफेगाव येथील वाळू ठिकाणाहून जवळपास ५हजार ब्रास,उंबरे (वे)येथून ५हजार ब्रास,तर जांबुड येथून ८हजार ब्रासचा वाळू उपसा होणार आहे. त्यामुळे मागणी करणार्‍या लोकांना नव्या वाळू धोरणानुसार प्रति ब्रास ६०० रुपयांनी वाळू उपलब्ध करून देण्यात येणार आहे.असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील,खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर ,विधान परिषदेचेआमदार रणजितसिंह मोहिते पाटील, भाजपाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व आमदार सचिन कल्याण शेट्टी, रवी पाटील,शशिकांत चव्हाण,भाजप प्रदेश कार्यकारणी सदस्य राजकुमार पाटील, विधान परिषेद सदस्य जयंत आसगांवकर, सोलापूर जिल्ह्यधिकारी मिलिंद शंभरकर ,तुषार ठोंबरे अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर,सुरेश शेजुळ तहसीलदार माळशिरस ,नामदेव टिळेकर उपविभागीय अधिकारी माळशिरस, जांबुड ग्रामपंचायत सरपंच स्वाती खटके, उपसरपंच सुहास यादव,ग्रामपंचायत सदस्य विश्रांती कचरे,सुजाता माने,हर्षवर्धन भोसले, समाधान नाईकनवरे,बिरू थोरात,सचिन चंदनशिवे,सुमित भोसले,अर्जुन अडसुळ,भिमराव खटके,सतिश पवार,शिवाजी केचे,हणमंत बेलदर,सोसायटीचे चेअरमन राहूल खटके दादासाहेब माने ,ग्रामसेवक जाधव साहेब,शहाजी कचरे, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!