श्रीपूर-महाळुंग आरोग्य वर्धिनी केंद्राला मिळाली नवीन रुग्णवाहिका | Ambulance
रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज

रुग्णवाहिका :आपत्कालीन वैद्यकीय वाहतूक सेवा पुरवण्यासाठी 24 तास मोफत सेवा उपलब्ध असणार
श्रीपूर तालुका माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर आरोग्य वर्धिनी केंद्राला जिल्हा परिषद सोलापूर आरोग्य विभाग चौदाव्या वित्त आयोगा मधून सुसज्ज अशी प्राथमिक उपचार उपलब्ध असणारी नवीन मोठी रुग्णवाहिका देण्यात आली आहे. यामुळे परिसरातील रुग्णांची तात्काळ नजीकच्या उपकेंद्रात व सरकारी, रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्याची सोय करण्यात आली आहे.
ही रुग्णवाहिका आपत्कालीन वैद्यकीय वाहतूक सेवा पुरवण्यासाठी 24 तास असणार आहे. त्यामध्ये आपत्कालीन वाहतूक सेवा, गरोदर स्त्रिया, नवजात बालके आणि त्यांच्या मातांसाठी तसेच, जननी सुरक्षा योजना आणि जननी शिशू सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत 24×7 तास मोफत सेवा देण्यात येणार आहे. या रुग्णवाहिके मध्ये रुग्णांना प्रथमोपचार देखील केले जाणार आहेत आणि त्यांना जवळच्या उपकेंद्रात किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये तात्काळ पोचवले जाणार आहे. अशी माहिती आरोग्य वर्धिनी केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सचेतन घोडके यांनी दिली.
रुग्णवाहिकेची पूजा डॉ.सचेतन घोडके, डॉ.सौ.गायकवाड, डॉ.भारत गायकवाड, आरोग्य सेविका विद्या वाघमारे यांच्या शुभहस्ते करण्यात आली. या वेळे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.