महाराष्ट्र

जि.प.प्रा.शाळा, श्रीपूर ‘आशा हेळकर’ (राजगुरू) मॅडम कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित

मंगळवेढा मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते झाले पुरस्काराचे  वितरण

जि.प.प्रा.शाळा, श्रीपूर ‘आशा हेळकर’ (राजगुरू) मॅडम कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित

श्रीपूर तालुका माळशिरस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या कृतिशील शिक्षिका,  शाळेमध्ये वर्षभर विद्यार्थ्यांच्या हिताचे गुणवत्तेच्या दृष्टीने उपक्रम राबविणाऱ्या आशा लक्ष्मण हेळकर (राजगुरू) यांना छत्रपती शिवाजी सांस्कृतिक व क्रिडा मंडळ परिवार मरवडे च्या वतीने सन २०२३-२४  ‘कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी गेले अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण  विकासासाठी योगदान दिलेले आहे तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या सामाजिक प्रबोधन देखील करत आहेत. राजगुरू मॅडम जि.प.प्रा.शाळा,श्रीपूर मध्ये हजर झाल्यानंतर त्या शाळेचा विद्यार्थी पट सात होता, तो आज चाळीसचे वर होऊन सर्व पालकांचा विश्वास संपादन करून, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सांस्कृतिक विकास त्यांनी केला आहे.  या सर्व कार्याचा विचार करून त्यांना कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले आहे. 

या पुरस्काराचे वितरण मंगळवेढा येथे आमदार समाधान अवताडे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, उपजिल्हाधिकारी मा.अभयसिंह मोहिते, शिक्षणाधिकारी कादर शेख, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर, समिती जिल्हा अध्यक्ष सुरेश पवार, शरद रूपनवर,लालासाहेब गायकवाड, अनिल कादे, या मान्यवरांच्या  शुभ हस्ते पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. यावेळी जि.प.प्रा.शाळा श्रीपूर येथील मुख्याध्यापक अजित पवळ, महादेव राजगुरू, अशोक राजगुरू, सुनील बामणे, अंकुश वाघमारे, प्रशांत चिंचकर, दशरथ डोलारे, हनुमंत लोहार , भारत गोरवे , सुवर्णा घोरपडे मॅडम आदि मान्यवर उपस्थित होते.

आशा राजगुरू(हेळकर) मॅडमची आणखी ओळख सांगायची झाले तर सैराट मधील मुख्य नायिका रिंकू (आर्ची) राजगुरू च्या त्या मातोश्री आहेत. पुरस्कार प्राप्त झाल्याची बातमी सोशल मीडिया मधून  समजताच सर्वांकडून त्यांचे अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!