श्रीपूरला पोलीस स्टेशन होणार! प्रस्ताव पाठविणार-पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश
सांगोला, मंगळवेढा, अन् करमाळ्याला आणखी एक पोलीस ठाणं, श्रीपूरलाही उभारणार

श्रीपूर, सांगोला, मंगळवेढा, अन् करमाळ्याला आणखी एक पोलीस ठाणं उभारणार
अतिरिक्त पोलिस अधीक्षकाचं पद वाढणार : कृष्ण प्रकाश
सोलापूर जिल्ह्यामधील मोठ्या तालुक्यांमध्ये आणखी एक पोलिस ठाणं वाढविण्याचा विचार असून, सांगोला, मंगळवेढा आणि करमाळा येथे एक एक ठाणं उभारण्यात येणार असून, श्रीपूर येथेही पोलिस ठाणे सुरू करण्यासाठी प्रस्ताव देण्यात येईल, अशी माहिती अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश यांनी दिली. शिवाय जिल्ह्याला आणखी एक अतिरिक्त पोलीस अधीक्षकांचे पद निर्माण करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. ग्रामीण जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी अपर पोलिस महासंचालक कृष्ण प्रकाश हे तीन दिवसांपासून सोलापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी मत व्यक्त केले. यावेळी पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेतील मुलींसाठी आणि ऑफिस मधील महिलांसाठी पोलिस दीदी, पोलिस काका
मुली व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिस काका, पोलिस दीदी हा उपक्रम चांगल्याप्रकारे राबवण्यात येणार आहे. यात प्रत्येक शाळेत जाऊन मुलींसाठी महिला पोलिस आणि मुलांसाठी पुरुष पोलिस जातील. तेथे जाऊन त्यांच्याकडून माहिती घेत त्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी संपर्क साधण्यासाठी त्यांना आपला नंबर देतील, अशाचप्रकारे मोठ्या कंपन्यांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी लेडी पोलिस जाऊन तेथे आपला नंबर शेअर करतील.