एक राखी सैनिक, पोलिस व डॉक्टरांसाठी-शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानचा उपक्रम | Rakhi
श्रीपूरच्या राख्या (Rakhi) सीमेवरील सैनिक व पोलिसांकडे पोस्टामधून रवाना

श्रीपूर- महाळुंगच्या भगिनींनी सैनिक बांधवांना पाठवल्या राख्या (Rakhi 2023)
शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान कडून सैनिक,पोलीस,शासकीय डॉक्टर यांना पाठविल्या राख्या
श्रीपूर : श्रीपूर (ता.माळशिरस) येथील शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानच्या सर्व महिला सदस्यांनी व परिसरातील महिला भगिनींनी सीमेवरील जवान, पोलीस आपल्या जीवाची बाजी लावून देश संरक्षण करीत असतात. तर शासकीय रुग्णालयातील डॉक्टर व सर्वच कर्मचारी जीवाची पर्वा न करता रुग्णांवर रात्रंदिवस उपचार करत आहेत, रुग्णसेवा देत आहेत हे सर्वजण कर्तव्य बजावताना अनेक सण, वार, उत्सव यांच्या पासून व आपल्या कुटुंबापासून वंचित राहत असतात. त्यांना सेवेच्या ठिकाणी राखी (Rakhi 2023) पौर्णिमा साजरी करता यावी म्हणून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा सुरेखा जाधव, उपाध्यक्षा सविता नाईकनवरे, सचिव सारिका नाईकनवरे यांनी परिसरातील महिलांना राख्या पाठवण्यासंदर्भात आव्हान केले होते. याला प्रतिसाद देत महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा लक्ष्मी चव्हाण, नगरसेविका शारदा पाटील, नगरसेविका जोशना सावंत-पाटील, नगरसेविका तेजश्री लाटे, प्रतिष्ठानच्या सदस्या विजया नाईकनवरे, करुणा धाइंजे, कांचन देवडकर, सारिका मोहिते, रंजना अडसूळ, संगीता उकरंडे या महिला भगिनींनी राख्या एकत्रित करून श्रीपूर पोस्टा मधून सैनिक, पोलिस व डॉक्टरांना पाठविल्या.
यावेळी श्रीपूर पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर लक्ष्मण फड, पो.असिस्टंट दिनेश फाळके, पोस्टमन आकाश बिडवे, पॅकर सुरज कुंटे, ब्रांच पोस्ट मास्तर सलीम मुलानी, नामदेव पाटील, विक्रमसिंह लाटे, दत्तात्रय चव्हाण, धर्मेश जाधव यांनी राख्या पाठवण्यासाठी महिला भगिनींना मदत केली.
शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठानने राख्या बरोबरच त्यामध्ये एक शुभेच्छा पत्र देखील पाठवले आहे आणि बहिण-भावाचे नाते अधिक घट्ट करण्याच्या दृष्टीने समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. श्रीपूर पोस्टाने राख्या पाठविण्यासाठी स्वतंत्र जलद यंत्रणा उभा केल्यामुळे महिला भगिनी मधून त्यांचे कौतुक केले जात आहे.