महाराष्ट्र

श्रीपूर मध्ये आंबेडकर जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा झाला गौरव

मान्यवर आणि भीमसैनिकांनी केले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन 

श्रीपूर डाँ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व स्मारक समिती कडून झाली आदर्श जयंती साजरी.

पारंपारिक वाद्यांच्या गजरामध्ये ढोल, पिपाणी, हलगीच्या सुमधुर वाद्यात जयंती केली साजरी.

श्रीपूर तालुका माळशिरस भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती  उत्सव समिती श्रीपूर व भारतरत्न डाँ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती श्रीपूर यांच्या वतीने १३२ वी जयंती श्रीपूर मध्ये सामाजिक उपक्रमांनी व पारंपारिक वाद्याच्या गजरात साजरी करण्यात आली. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते भव्य अशा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.  डॉ.अमृता भोसले एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल, आकाश बनसोडे मुंबई पोलीस दलात भरती झाल्याबद्दल व आरोही हरिश्चंद्र भोसले एटीएस व मंथन परीक्षेत  सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल  या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करून करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अकलूज पोलीस स्टेशनंचे  पोलीस निरीक्षक दिपरत्न गायकवाड, ऍड प्रकाशराव पाटील, न्यायाधीश शशिकांत  महादार,   महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष भीमराव रेडे, मुख्याधिकारी कौस्तुभ गव्हाणे, पीएसआय स्वाती कांबळे मॅडम, मा. पंचायत समिती उपसभापती प्रतापराव पाटील, नगरसेवक नानासाहेब मुंडफने, नगरसेवक राहूल अप्पा रेडे, नगरसेवक सोमनाथ  मुंडफने, नगरसेवक प्रकाश नवगिरे, नगरसेवक निनाद पटवर्धन, नगरसेवक नामदेव इंगळे, नगरसेवक तानाजी भगत,  नगराध्यक्षापती अशोक चव्हाण, मोहसीन पठाण,  मौला पठाण,  रावसाहेब सावंत पाटील, मौला  पठाण,  विक्रम लाटे, नामदेव पाटील, रजेन्द्र वाळेकर,  शिवाजी रेडे, महावीर शहा, मोहसीन पठाण, शरद  मुंडफने, शामराव भोसले,  भारत  आठवले,  नितीन वाघमारे,  सागर यादव, रतनसिंह  रजपूत, अल्लबक्ष शेख , मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे, माजी मुख्यध्यपक नागनाथ वाघमारे सर, तेजस रेडे, नरेंद्र भोसले, ब्रिमा सागर डिस्टंलरीजचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर,  उत्पादन मॅनेजर नरेश  पाठक,  चीफ केमिस्ट अरगडे,  एएसआय बाळासाहेब पानसरे,  पोलीस कॉन्स्टेबल चंदनशिवे, गायकवाड,  शिरसट, राजे ग्रुपचे मा.अध्यक्ष बबन कदम, दत्तात्रय यादव, पिनू भोसले,  पत्रकार विजयकुमार देशमुख, लखन धुमाळ, बाळासाहेब कामते,  इत्यादी उपस्थित होते.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संजय खरे,  अध्यक्ष सिद्धार्थ जगधने, संदीप घाडगे, बी टी शिवशरणं,  तुकाराम बाबर, बापूसाहेब पोळके, बंटी चंदनशिवे, शैलेश  शेंडगे,  रमेश भोसले, दावलं शिवशरण,  अनिल आठवले,  तेजस बाबर, गणेश  सावंत,  विश्वजीत भालशंकर, नितीन आठवले, नागेश  काटे, विशाल  जगधने,  जालिंदर  खरात, महेश  रणपिसे, मोती फराडे, कपिल घाडगे, राजकुमार सुरवसे, समाधान लांडगे, गौतम  आठवले, गुडम भालशंकर, महादेव ताकतोडे, अनिल शिवशरण, राजू नवगिरे, राजू गायकवाड, इत्यादीनी जयंती यशस्वी करण्यासाठी परिश्रम  घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी केले तर आभार बी टी शिवशरण  यांनी मानले. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!