विजयकुमार गुंड -पाटील ‘कृषीरत्न’ पुरस्काराने सन्मानित | Shri Agro Group
पुण्यामध्ये प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा 2023 संपन्न

मिरे तालुका माळशिरस येथील प्रगतशील शेतकरी विजयकुमार भीमराव गुंड-पाटील यांना सातारा येथील श्री अग्रो ग्रुप कंपनी कडून पुण्यामध्ये प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा 2023 चे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विजयकुमार भीमराव गुंड-पाटील यांना श्री ऍग्रो ग्रुप यांच्याकडून पुणे येथे आज ‘श्री ऍग्रो कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विजयकुमार भीमराव गुंड-पाटील यांनी आपल्या शेतामध्ये केळीचे विक्रमी पीक उत्पादित केल्याबद्दल व सर्वांपुढे एक नवीन आदर्श ठेवल्याबद्दल त्यांची या श्री ऍग्रो ग्रुप कडून पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.
मिरे येथील विजयकुमार गुंड-पाटील नेहमीच आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रयोग करून वेगवेगळ्या पिकांचे विक्रमी उत्पादन मोठ्या प्रमाणात काढत असतात. परिसरातील अनेक छोटे-मोठे शेतकरी त्यांच्या शेती प्लॉट वरती मार्गदर्शनासाठी आणि पिके पाहण्यासाठी नेहमीच जात असतात. प्रयोगशील व प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची परिसराला ओळख आहे. याची दखल घेत श्री ऍग्रो ग्रुपने, श्री ऍग्रो कृषीरत्न पुरस्कार २०२३ देऊन सन्मानित केले आहे. सदर बातमी सोशल मीडिया वरती पसरताच त्यांचे सर्वांकडून अभिनंदन करण्यात येत आहे व शुभेच्छा संदेश पाठवले जात आहेत.