पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड ही काळाजी गरज- विजय नाईक, स्टेट एक्साईज
कारखान्याच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण

श्रीपूर प्रतिनिधी
श्रीपूर तालुका माळशिरस येथील ब्रिमासागर महाराष्ट्र डिसलरी या कारखान्याच्या वतीने जगातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी तसेच पृथ्वीचे हवामान स्थिर राहण्यासाठी प्रत्येक वर्षी जगासह भारतामध्ये जास्तीत जास्त रोपांचे वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ब्रिमा सागर डिस्टलरीज लिमिटेड श्रीपूर चे स्टेट एक्साइज विजय नाईक यांनी केले ते श्रीपूर येथील ब्रिमा सागर कारखान्यामध्ये ५ जून पर्यावरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमांमध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रिमा सागर कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर हे होते. यावेळी प्रारंभी स्टेट एक्साइज विजय नाईक यांच्या हस्ते लिंबाच्या झाडाला पाणी घालून वृक्षारोपण करण्यात आले. यानंतर जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत, डेप्युटी मॅनेजर नरेश पाठक, केमिस्ट अरविंद इंगळे यांच्या हस्ते लिंब, वड, चिंच, आशोक या ५०० रोपांचे कारखान्याच्या मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रस्ताविकामध्ये कारखान्याचे डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत म्हणाले की ब्रिमा सागर कारखाना परिसरामध्ये प्रत्येक वर्षी जास्तीत जास्त वृक्षारोपण करण्याचा मानस असतो. आतापर्यंत कारखान्याने लिंब, चिंच, वड, अशोक, आंबा, नारळ, जांभुळ, चिकु,गुलमोहर व विविध प्रकारचे ४ हजार झाडे लावली असून त्या सर्व झाडांचे कारखाना चांगल्या प्रकारची काळजी घेऊन संगोपन करत असल्याचे सांगितले. यावेळी विजय नाईक यांचा दिनकर बेंबळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना विजय नाईक म्हणाले की आधुनिकीकरणामुळे वातावरणात फार मोठे बदल होत आहेत तापमानात मोठी वाढ होत आहे मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजन साठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन करणे गरजेचे आहे. प्रत्येकाने वृक्ष लावण्यासाठी व ती जपण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत तरच आपण पृथ्वीचा समतोल राखू शकू, आज आपल्या महाराष्ट्रामध्येच कोकण मध्ये सातशे ते आठशे किलोमीटरच्या परिसरामध्ये डोंगरदऱ्यामध्ये घनदाट झाडांचे जंगल झाले हा परिसर बहरला असून प्रत्येक वर्षी या परिसरात आपल्यापेक्षा प्रचंड स्वरूपात झाडांमुळे पाऊस पडतो तेथील हवामानाने स्वच्छ आहे ऑक्सिजनही भरपूर मिळतो त्याप्रमाणे आपल्या परिसरामध्येही मोकळ्या जागेत प्रत्येकाने वृक्ष लागवड करावी असे आवाहन शेवटी विजय नाईक यांनी केले.
शेवटी सर्वांचे आभार ईटीपी विभागप्रमुख डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत यांनी मानले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी सदाशिव खटके, प्रकाश कदम, सुदाम कुलकर्णी, बापू वगरे, शुभम भोसले यांनी परिश्रम घेतले.