मिरे (से.14 ) हद्दीमध्ये सापडला तरुणाचा मृतदेह | Mire | Shreepur
नग्न अवस्थेत सापडला मृतदेह

मिरे (से.14 ) हद्दीमध्ये प्रेत बेवारस स्वरूपात सापडले
श्रीपूर तालुका माळशिरस मिरे हद्दीमध्ये सेक्शन 14 येथे काल सायंकाळी 5 वाजल्याचे सुमारास अंदाजे वय 30-35 वर्षे अंगावरती वस्त्र नसलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह सापडल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अकलूज-श्रीपूर पोलीस स्टेशनचे ए.पी.आय. विक्रम साळुंखे, ए.एस.आय. बाळासाहेब पानसरे व त्यांच्या इतर पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे.
“सदरचा व्यक्ती श्रीपूर पोलीस दूरक्षेत्र ,अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत मौजे मिरे गावच्या हद्दीमध्ये शेती महामंडळाच्या जमिनीमध्ये बेवारस स्थितीत मयत अवस्थेत आढळून आला आहे. याच्या वारसा बाबत व नातेवाईकाबाबत शोध घ्यावा, मुख्यत्वे ऊसतोड कामगार अनुषंगाने शोध घ्यावा. सदर प्रेताची ओळख पटल्यानंतर तात्काळ अकलूज पोलीस स्टेशनची संपर्क साधावा.” असे आवाहन अकलूज पोलिसांकडून करण्यात आले आहे. पुढील अधिक तपास API विक्रम साळुंखे करीत आहेत.