महाळुंग (पायरीपुल) येथे ७ गांजाच्या झाडांसह आरोपीवर अकलूज पोलिसांची कारवाई
महाळुंग मध्ये पोलिसाची कारवाई : वयोवृद्ध इसमास अटक

घराला चिकटून बाजूला गांजाची लागवड, चार,सहा फुटांची सात झाडे, पोलिसांनी केली जप्त
पायरीपुल-महाळुंग येथे ७ गांजाच्या झाडांसह आरोपीवर कारवाई करण्यात आली.
श्रीपूर : महाळुंग पायरीपुल (ता. माळशिरस) येथे घराच्या अगदी जवळ बाजूला गांजाची झाडे असल्याची माहिती अकलूज पोलिसांना मिळताच त्यांनी धाड टाकून सुमारे ४ किलो वजनाच्या ४५ हजार किमतीच्या गांजाची सात झाडांसह आरोपीला ताब्यात घेऊन अमली पदार्थ विरोधी कायद्यातंर्गत गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात अकलूज पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार अकलूज पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरत्त्न गायकवाड यांना पायरीपूल महाळुंग येथील पाण्याचे टाकी शेजारी जाणक्या काळे याचे घराचे बाजूस गांजाची झाडे लावली असल्याची बातमीदारामार्फत बातमी मिळाली. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांना कळवून पोलिस स्टाफासह इलेक्ट्रॉनिक वजन काटा, लेखणी साहित्य, पंचासह महाळुंग येथील जाणक्या काळे याचे घरासमोर असलेले बाथरुमच्या मागील बाजूस जाऊन पाहिले असता गांजाची हिरवा पाला असलेली झाडे दिसली. त्यापैकी सहा फुट उंचीची ४, ५ फुट उंचीची १, २ फुट उंचीची २ अशी एकुण ७ झाडे त्याचे वजन ३ किलो ७५७ ग्रॅम असे ४५ हजार ८४ रुपये किमतीची झाडे जप्त करण्यात आले. तसेच जानक्या बाशा काळे (वय ७३ वर्षे, रा. पायरीपूल, महाळुंग) यास अटक करण्यात आली आहे.
सदर कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड, पो.स. ई. बबन साळुंके, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, लक्ष्मण पिंगळे, मनोज शिंदे, सिद्धाराम कंटोळी, नितीन लोखंडे, प्रवीण हिंगणगावकर, पांडुरंग जाधव यांनी केली आहे. अधिक तपास सहायक पो. नि. गणेश चौधरी हे करीत आहेत.