वाढदिवसाला कार्यकर्ते घेऊन गेले, नेत्यासाठी 2000 किलो वजनाचा फुलांचा हार
हार उचलण्यासाठी लागला जेसीबी, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांना वाढदिवसानिमित्त महाळुंग येथील मोहिते-पाटील समर्थक कार्यकर्त्यांकडून दोन हजार किलो फुलांचा हार घालून सत्कार
अकलूज : मोहिते-पाटील कुटुंबाचे आणि पूर्व भागातील जनतेचे अतिशय सलोख्याचे आणि एकनिष्ठ संबंध आहेत. महाळुंग-श्रीपूर मधील अनेक कार्यकर्त्यांची मोहिते-पाटील कुटुंबियां बरोबर गेले अनेक वर्षापासून वेगळी प्रेमाची नाळ जोडली गेलेली आहे. या प्रेमाचे दर्शन आज वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांना दिसून आले आहे.
कै.उदयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे चिरंजीव अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाळुंग मधील मोहिते-पाटील समर्थक सागरदादा यादव, बजरंग भोसले, विपीन रणे, बबलू भगत, रमेश देवकर, नितीन जाधव, राजू शिंदे, अक्षय जाधव, रोहित मुंडफणे, विनोद मगर, नागनाथ भोसले, सुधीर भोसले, अनिल सरवदे अशा अनेक महाळुंग मधील युवा कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून आपल्या नेत्याच्या सत्कारासाठी दोन हजार किलो फुलांचा हार, केक, फटाक्यांची आतिषबाजी, हलग्यांचा आवाज, आशा जल्लोषामध्ये माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला. या वाढदिवसा प्रसंगी स्वयंप्रभादेवी मोहिते-पाटील, शिवतेजसिंह मोहिते-पाटील आणि देवन्या मोहिते-पाटील उपस्थित होत्या.
या वाढदिवसाची, सत्कार केलेल्या फुलांच्या हाराची, तालुक्या मध्ये, जिल्ह्यामध्ये मोठी चर्चा व कुतुहलाचा विषय ठरला आहे. सदर सत्काराचा फोटो सोशल मीडिया वरती व्हायरल झालेला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर देखील या बातमीला फोटोला अनेक लाइक्स मिळाल्या आहेत.