4 तारखेला अकलूज मध्ये होणार सिझेरियन प्रसूती चर्चासत्र
तज्ञ डॉक्टरांच्या कडून शंकेचे निरसन, विचारू शकता प्रश्न

तज्ञ डॉक्टरांच्या कडून शंकेचे निरसन, विचारू शकता प्रश्न
अकलूज स्त्री आरोग्य तज्ञ संघटना व महाराष्ट्र स्ञी आरोग्य तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शंकरनगर अकलुज येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील स्मृती भवन येथे शनिवार दि. ४ मार्च रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत ‘प्रश्न तुमचे उत्तर तज्ञांचे’ यानुसार सिझेरियन प्रसूती चर्चासत्र आयोजित केले असल्याची माहिती अकलूज येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रिया कदम डाँ वंदना गांधी यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉटर मॉम फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शीतलदेवी धैर्यशील मोहिते-पाटील उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रात सिजेरियन संबंधित असलेले गैरसमज दूर करण्यास व सिझेरियन नंतर आई व बाळाची काळजी कशी घ्यायची आहे, यावर तज्ञ डॉक्टरांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. या चर्चासत्रासाठी अकलूजमधील बालरोग तज्ञ डॉ. राजीव राणे, डॉ. नितीन एकपुरे, डॉ. अभिजीत बडवे, डॉ. प्रवीण शिंदे हे मार्गदर्शन करणार असून याबरोबरच खी आरोग्य तज्ञ डॉ.सतीश दोशी, डॉ. वंदना गांधी, डॉ. सविता गुजर, डॉ. भारत पवार, डॉ. दत्ता सर्जे, डॉ. विनोद शेटे, डॉ.कल्पना डॉ. कविता लोंढे, डॉ. प्रिया कदम, डॉ.मनीषा शिंदे, डॉ.रेवती राणे, डॉ. मानसी देवडीकर, डॉ. ज्योती आनंद कळवसकर हे तज्ञ डॉक्टर या चर्चासत्रात सहभागी होणार