संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३७ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

हुपरी येथे संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी.
हुपरी (हर्षल पोतदार) ता.हातकणंगले येथे विश्वकर्मा पांचाळ सोनार समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची ७३७ वी पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोनार समाज सभागृहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी संत शिरोमणी नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सोनार समाज महिला भजनी मंडळाने भजनाचा बहारदार कार्यक्रम सादर केला. दुपारी १२ वा.संत नरहरी महाराज यांची आरती करून पुष्पवृष्टी करण्यात आली.त्या नंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी सोनार समाजातील सर्व लहान,थोर पुरूष व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.हुपरी येथे दरवर्षी श्री विश्वकर्मा पांचाळ सोनार समाज वर्षभर विविध उत्सव व समारंभाची परंपरा कायम राखत सोनार समाज मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडतात.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी समाजातील सर्वांनी सहकार्य,मदत व परिश्रम घेतले.