सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल – पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुविधेचा प्रारंभ

सोलपूर :,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मुंबई ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्याने जिल्ह्यातील तिर्थक्षेत्र पर्यटनाला नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास महसूल तथा पालक मंत्री मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या दोन वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुविधेचा प्रारंभ शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुंबई येथून झाला.मंत्री राधाकृष्ण विखे पाटील नगर येथून दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शिर्डीसह सोलापूर जिल्ह्य़ातील तिर्थक्षेत्रां करीता अतिशय महत्पूर्ण ठरणाऱ्या या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा झालेला शुभारंभ तिर्थक्षेत्र पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण बाब आहे.मुंबई येथून ही रेल्वे सुरू करावी आशी मागणी पंतप्रधान आणि रेल्वेमंत्री यांच्यकडे केली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याचे समाधान व्यक्त करतानाच एकाचवेळी राज्याला दोन वंदे भारत एक्सप्रेस मिळणे राज्याच्या इतिहासात मोठी बाब असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
कोव्हीड संकटानंतर मेक इन इंडीया या संकल्पनेतून तसेच स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने देशातील महत्वपूर्ण राज्यांना जोडण्यासाठी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू करण्यात आल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की सोलापूर जिल्ह्यातील तिर्थस्थानी येणार्या भाविकांचा प्रवास अतिशय कमी वेळात होईल.
भाविकांची वर्दळ वाढल्यास पर्यटन वाढेल आणि तिर्थक्षेत्रांच्या स्थानिक अर्थकारणाला पाठबळ मिळेल असा विश्वास पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.
या रेल्वेच्या मागणीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून जिल्ह्याच्या तिर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने निर्माण करून दिलेल्या संधीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आभार मानले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यातील नगर आणि सोलापूर या दोन जिल्ह्याकरीता वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे सुरू झाल्या नगर प्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील आळंदी पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट सिध्देश्वर या तिर्थक्षेत्रांकरीता ही रेल्वे सुविधा मोठी उपलब्धी असल्याने दोन्ही जिल्हयांचा पालकमंत्री म्हणून केंद्र सरकारच्या ऐतिहासिक निर्णयाचा मला व्यक्तिशा मोठा आनंद आणि समाधान असल्याचे मंत्री विखे यांनी आवर्जून सांगितले.