श्रीपूर दि बृ.म.शु. सि. एम्पॉ.सोसायटीवर सत्ताधाऱ्यांचा विजय | The BMSSECOC Society Shreepur
सर्व 11 उमेदवार आले निवडून

श्री जगदंबा कामगार विकास पॅनल चे सर्व 11 उमेदवार विजयी | कोणाला किती मते मिळाले ? पहा.
श्रीपूर तालुका माळशिरस येथील दि बृ.म.शु. सि. एम्पॉ. को. ऑ. क्रेडीट सोसायटी लि. श्रीपूर या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक – २०२२-२३ ते २०२७-२८ ची शनिवार २५.०३.२०२३ रोजी दुपारी चार वाजता पार पडली लगेचच मतमोजणी झाली. गेले पंधरा वर्षापासून या सोसायटीची बिनविरोध निवड होत होती. यावेळी विरोधकांनी पॅनल करून ही निवडणूक, विरोधक, सत्ताधारी आणि अपक्ष यांच्या मध्ये लढली गेली. या निवडणुकीत पंधरा वर्षे सत्तेवर असलेला श्री जगदंबा कामगार विकास पॅनलच्या सर्व 11 उमेदवारांचा भरगोस मताने विजय झाला आहे.
कोणाला किती मते मिळाले पहा.
अ.क्र. उमेदवाराचे नांव – मिळलेली मते – गट
१ श्री. विजय बापू पाटील 366 सर्व साधारण
२ श्री. नवनाथ सदाशिव मलपे 351 सर्व साधारण
३ श्री. पांडुरंग दामोदर गोरे 279 सर्व साधारण
४ श्री. रघुनाथ बळीराम देठे 350 सर्व साधारण
५ श्री. सुभाष ज्ञानोबा पवार 370 सर्व साधारण
६ श्री. विश्वनाथ अनंत कुलकर्णी 306 सर्व साधारण
७ श्री. रामचंद्र गोरख गोफणे 388 भ.वि.जा.ज.
८ श्री. संजय विश्वनाथ यादव 388 इतर मागासवर्गीय
९ श्री. कुमार नामदेव शिंदे 343 अनु.जा.ज.
१० सौ. सुनिता सर्जेराव जाधव 386 महिला राखीव
११ सौ. कविता विजय गुरव 385 महिला राखीव
निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे स्थानिक सर्व संस्थांनी, सभासदांनी उमेदवारांचे मिरवणूक काढून सत्कार केले व भावी वाटचालीस शुभेच्छा देखील दिल्या.