वंचित बहुजन आघाडी श्रीपूर कडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी श्रीपूरच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त वंचित बहुजन आघाडी श्रीपूरच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
श्रीपूर तालुका माळशिरस येथील वंचित बहुजन आघाडी शहर शाखेच्या वतीने संविधान निर्माते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीपूर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यामध्ये वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शॅपनर व खाऊ सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला.
यावेळी अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड साहेब, संतोष ढेरे सर, धाराव सर, स्वप्निल मदाल सर, पवळ सर, मोहन बाड व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संयोजक वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नौशाद शिकलकर, जिल्हा सदस्य रवींद्र कांबळे, श्रीपूर शहर अध्यक्ष सुरेश मोटे, अंबादास ननवरे, अतुल लोंढे, डॉ.समीर मलिक, जालिंदर खरात, संतोष भोसले यांनी कार्यक्रमाचे नियोजन करून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडला.