पांडुरंग सह.साखर कारखान्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यशाळा संपन्न | PSSK Shreepur
श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यशाळा संपन्न

श्रीपूर येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कार्यशाळा संपन्न
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग सोलापूर यांच्या वतीने नवनियुक्त दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचारी यांची कार्यशाळा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रशस्त शेतकरी भवन मध्ये आयोजित केली होती. यावेळी पंढरपूर विभागाचे निरीक्षक श्री.पंकज कुंभार साहेब व कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी साहेब प्रोडक्शन मॅनेजर श्री.एम.आर.कुलकर्णी, डिस्टीलरी मॅनेजर श्री.राजाराम पाटील आदी उपस्थीत होते.
यावेळी अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम यांनी नवनिर्वाचित नियुक्ती झालेल्या दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचारी यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींची माहिती देऊन साखर कारखान्याच्या आसवनी प्रकल्पामधील उत्पादनावर कशाप्रकारे कामकाज करावे याबाबत सूचना व मार्गदर्शन केले. त्याचबरोबर कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचा उल्लेख करून कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री. प्रशांतराव परिचारक (मालक), व्हा.चेअरमन मा.श्री. कैलास खुळे व कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांच्या सुयोग्य नियोजनाचे कौतुक करून कारखाना सर्व बाबीमध्ये अग्रेसर असून केंद्र सरकारच्या सर्व नियम व अटी पाळून कारखाना व आसवनी प्रकल्प योग्य पद्धतीने चालवून उत्पादन घेत असलेल्या बाबींचा उल्लेख केला. त्याचबरोबर कारखाना वआसवनी प्रकल्पास प्रशिक्षणार्थी यांच्या समवेत भेट देवून कारखान्याने केलेल्या उपाय योजनाची पहाणी केली. तसेच साखर निर्मीती, मळी निर्मीती व वापर, मद्यार्क निर्मीती व वापर, इथेनॉल निर्मीती व वापर, या विषयाचे नियमावलीवरील व्याख्यान दिले. तसेच कारखान्याच्या डिस्टीलेशन, फरमेंटेशन, अल्कोहोल, स्ट्रेंथ तपासणी, वेअर हाऊस, रिसीव्हर, स्टोरेज व्हॅट, मोलॅसीस टॅंक याची पहाणी करुन कार्यालयीन रजिस्ट्रर SCM कार्यप्रणालीची माहिती घेतली.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी साहेब यांनीही कारखाना राबवत असलेल्या योजनांचा व शासकीय नियमांची माहिती देऊन राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षक श्रीमती भाग्यश्री जाधव मॅडम निरीक्षक, श्री. पंकज कुंभार साहेब त्याचबरोबर श्री.गायकवाड साहेब यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करून स्वागत केले व कारखान्याची प्रगती कशी होत गेली याबाबतची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाचे निरीक्षक श्री.पंकज कुंभार साहेब यांनी नवनियुक्त दुय्यम निरीक्षक व जवान संवर्गीय कर्मचारी यांना कारखान्याच्या आसवनी प्रकल्पामध्ये कशाप्रकारे कामकाज करावे याचे प्रेझेंटेशन द्वारे माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन दुय्यम निरीक्षक श्री.अजिंक्य गायकवाड साहेब व श्री. सुशांत हजारे साहेब यांनी केले.