महाराष्ट्र
महाळुंग-श्रीपूर मधील नवदुर्गा आपल्या भूमिका बजावतायेत चोख
घर प्रपंच्या, समाजकारण, राजकारण, देशसेवा, देशप्रेम, प्रबोधन

प्रत्येक स्त्री नवदुर्गा असते, आपल्या ठिकाणी ती आपली भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे बजावत असते. महाळुंग-श्रीपूर मधील या छायाचित्रामधील दिसणाऱ्या सर्व नवदुर्गा महिला एका कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपली भूमिका बजावत असताना एकत्रित आल्या, त्यावेळी घेतलेले हे छायाचित्र..
यातील सर्वजणी घर प्रपंच्या मधील आपली भूमिका चोख बजावत आहेत. यातील काही जणी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीच्या नूतन नगरसेविका होऊन राजकारणांमधून देखील आपली सेवा बजावत आहेत, तर देशसेवा, देशप्रेम काय असतं हे अनुभवणाऱ्या यामध्ये नवदुर्गा आहेत, वेगवेगळे समाजहिताचे उपक्रम घेणाऱ्या देखील यामध्ये नवदुर्गा आहेत. आपल्या वक्तृत्वामधून समाज प्रबोधन पर व्याख्याने देऊन जनजागृती करणाऱ्या देखील या नवदुर्गा आहेत.
आपणा सर्वांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.