महाराष्ट्र

महाळुंग (डांगेवस्ती) मध्ये भीषण अपघात – तिघे विद्यार्थी जखमी, दोन गंभीर

महाळुंग नॅशनल हायवे वरील अपूर्ण कामा मुळे अपघात – डांगेवस्ती पुन्हा हादरली

महाळुंग | स्विफ्ट गाडीने तिघा विद्यार्थ्यांना उडवले,दोन गंभीर | डांगेवस्तीतील अपघात पुन्हा चर्चेत

नॅशनल हायवेवरील अपुरे काम, बॅरिकेट्स तोडून विद्यार्थ्यांना धडक

माळशिरस तालुक्यातील महाळुंग (डांगेवस्ती) येथे सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. संत तुकाराम महाराज पालखी महामार्ग नॅशनल हायवे 965G वरील अपूर्ण व बेभरवशीर रस्त्यामुळे पुन्हा एकदा निष्पाप जीव अपघाताला सामोरे गेले.

स्थानिक अमन हजरत डांगे (इयत्ता 10 वी), रेहान आमीन डांगे (11 वी) आणि प्रतीक प्रकाश भोसले (12 वी) हे तिघे विद्यार्थी सायंकाळी सुरक्षित ठिकाणी दुचाकी शेजारी थांबलेले असताना, समोरून भरधाव वेगाने आलेल्या मारुती सुझुकी स्विफ्ट (MH 45 AD 8739) गाडीने बॅरिकेट तोडून थेट त्यांच्या अंगावर धडक दिली. गाडी बॅरिकेट आणि जाळी ओलांडून विद्यार्थ्यांना उडवत पुढे गेली.

या अपघातात अमन आणि प्रतीक हे गंभीर जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर अकलूज मधील अश्विनी हॉस्पिटल आणि गुळवे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.  हाताला, पाठीला आणि बरगड्यांना मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.

पूर्वीही याच ठिकाणी अपघात

विशेष म्हणजे, अवघ्या वीस दिवसांपूर्वी याच ठिकाणी विजेच्या ट्रान्सफॉर्मरवर एक वाहन आदळल्याने मोठ्या अपघाताची घटना घडली होती. या अपघातात ट्रान्सफॉर्मरचे मोठे नुकसान झाले होते आणि वाहनातील काही प्रवासी जखमी झाले होते. याच रोडला पुढे बोरगाव येथे उड्डाणपुलाखाली सर्विस रोडला एका बालकाचा गतिरोधक नसल्यामुळे जीव देखील गेला आहे.

या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे डांगेवस्ती परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिकांनी अनेक वेळा नॅशनल हायवे प्राधिकरणाकडे अपुऱ्या कामांविषयी तक्रारी करूनही योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही.

ग्रामस्थांची मागणी – आता पुरे!

ग्रामस्थांनी ठाम भूमिका घेत आता पुढील अपघात टाळण्यासाठी खालील मागण्या केल्या आहेत:

  • अपूर्ण काम तातडीने पूर्ण करावे

  • दोन्ही बाजूंना पथदिवे बसवावेत

  • योग्य दिशादर्शक फलक लावावेत

  • सर्व्हिस रोड तत्काळ सुरू करावा

  • सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना कराव्यात
  • ग्रामस्थांनी सांगितले की, जर लवकरच प्रशासनाने दखल घेतली नाही, तर याविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. लवकरच यासंदर्भात एक निवेदन संबंधित विभागाला देण्यात येणार आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!