नूरजहाँ शेख व दिपाली सोलनकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांनी सन्मानित
महाराष्ट्र शासन पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित

सौ.नूरजहाँ शेख व सौ.दिपाली सोलनकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांनी सन्मानित.*
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून) गणेशगाव (ता.माळशिरस) येथील कवियत्री लेखिका सौ.नूरजहाँ फकरुद्दीन शेख आणि सौ दिपाली युवराज सोलनकर याना महाराष्ट्र शासन पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.आज गणेशगांव ग्रामपंचायतीच्या कार्यालयमध्ये सरपंच सौ.उषा रामचंद्र ठोंबरे, उपसरपंच बाळू भीमाराव ठोकळे व ग्रामसेविका सौ.लता घुले यांचे हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या संचालिका लेखिका सौ. नूरजहाँ फकरुद्दीन शेख म्हणाल्या की सर्व महामनवांच्या जयंती गावकरी गावा गावात मोठ्या उत्साहाने साजरा करतात परंतु यामध्ये महिलांचा सहभाग अत्यल्प दिसून येत आहे. महिलांनी ही तितक्याच उत्साहाने सहभागी व्हायला पाहिजे.महामानवांना कोणीही जातीच्या चौकटीत बंदिस्त करू नये , त्यांचे कार्य संपुर्ण समाजासाठी सर्व जाती धर्मासाठी उल्लेखनीय आहे. मग आपण त्यांच्या उत्तुंग विचारांना जातीच्या भिंती मध्ये बंदिस्त करणे अयोग्य आहे.जयंती साजरी करताना डीजे च्या तालावर नाचचण्यापेक्षा या महान व्यक्तींच्या आदर्श घेऊन त्यांच्या विचारांवर चालण्याचा प्रयत्न करणे हाच खरा जन्मोत्सव साजरा करणे योग्य ठरेल.
यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ.मंगल रामचंद्र मदने,सदस्य पोपट विठोबा रुपनवर,सदाशिव जगन्नाथ शेंडगे,दादासाहेब नलवडे,रामचंद्र ठोंबरे,कुंडलिक शेंडगे,हनुमंत सोलंकर,नजीर शेख,नागेश ठोंबरे,पोलीस पाटील भाईसाब शेख,वसंत ठोकळे,बाळासाहेब रुपनवर,सिद्धेश्वर रुपनवर,तुकाराम नलावडे,ज्योतीराम नलवडे, नसरुद्दीन शेख,गणेश यादव,माऊली मदने आदी उपस्थित होते.