कृषी कन्यांकडून श्रीपूर मध्ये वृक्षारोपण | झाडे लावा झाडे जगवा’
"झाडे लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी" हा संदेश देत रत्नाईच्या कृषीकन्यांनी केले वृक्षारोपण

श्रीपूर ता.माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज तालुका माळशिरस येथील कृषीकन्यांनी श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय, व शहीद निवृत्ती जाधव स्मारक परिसर श्रीपूर येथे वृक्षारोपण केले..
वृक्ष लागवडीचे महत्त्व, त्याचे फायदे, वृक्षांचे माणसाच्या आयुष्यातील महत्व पटवून देत कृषीकन्या म्हणाल्या ” झाडे लावा, जीवन वाचवा, या धरती चे स्वर्ग बनवा, ” झाडे लावा दारोदारी, समृद्धी होईल घरोघरी” या प्रसंगी वड, पिंपळ, चिंच, कडुनिंब अश्या प्रकारची झाडे लावण्यात आली. या कार्यक्रमास महाळुंग-श्रीपूर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन कृषीकन्या दिपाली माने, वैष्णवी पाटील, वैष्णवी जगताप, प्रतिक्षा वाघमारे, साक्षी माळी, शीतल आंधळे, साक्षी सरडे, नेहा धापटे, रोशनी पवार यांनी केले. या कार्यक्रमास रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य आर. जी. नलावडे, कार्यक्रम समन्वयक एस. एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एच. व्ही. कल्याणी यांनी मार्गदर्शन केले