व्यायाम आणि वाचन माणसाला सशक्त बनवते – चंद्रशेखर गायकवाड
हायटेक इन्फोसिस कॉम्प्युटर सेंटर श्रीपूर 25 वा वर्धापन संपन्न

श्रीपूर तालुका माळशिरस येथील हायटेक इन्फोसिस या कॉम्प्युटर सेंटरच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने उत्तर पत्रिका लिहिताना आवश्यक असणारे दर्जेदार क्वालिटीचे पॅड देण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना राष्ट्र निर्मितीसाठी युवकांचे योगदान याविषयीचे चंद्रशेखर गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी व्यायाम आणि वाचन करणे ही काळाची गरज आहे, तरच आपली पिढी सुदृढ आणि सशक्त बनेल आणि सुदृढ युवकांची पिढी हीच आपले चांगले राष्ट्र घडवित असते असे मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते चंद्रशेखर गायकवाड, संतोष जाधव हायटेक इन्फोसिस संचालक, दत्तात्रय नाईकनवरे अध्यक्ष शिक्षक पालक संघ, सतीश गोसावी संचालक शिवज्योत कॉम्पुटर, ज्ञानेश कुलकर्णी संचालक सोहम कॉम्पुटर, जोतीराम जाधव संचालक ऑनलाईन कॉम्प्युटर, देविदास माने संचालक नेवरे कॉम्प्युटर, श्री चंद्रशेखर विद्यालयाचे मुख्याध्यापक पांडुरंग बनसोडे, उप मुख्याध्यापक नवनाथ अधटराव, पर्यवेक्षक सिताराम गुरव, ज्युनिअर कॉलेजचे सुनील गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारती सावंत मॅडम यांनी केले.तर आभार अधटराव सरांनी मानले.