मिल रोलरचे पूजन | क.सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह.सा.का. विस्तारीकरणाची कामे प्रगती पथावर
12 लाख मे.टनाच्या ऊस नोंदी

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलरचे पूजन
येणारा गळीत हंगाम 2023-24 हा कारखाना 9000 मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेने चालणार
12 लाख मे.टनाच्या ऊस नोंदी
श्रीपूर ता.माळशिरस येथीलकर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या गळीत हंगामाचा मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक (मालक) यांचे शुभहस्ते व व्हा.चेअरमन कैलास खुळे, सर्व संचालक आणि कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक (मालक) यांनी सांगीतले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात या गळीत हंगामासाठी सुमारे 12 लाख मे.टनाच्या ऊस नोंदी असुन या सर्व ऊसाचे गाळप करण्याच्या दृष्टीने कारखान्याने तोडणी वाहतुक यंत्रणेचे करार केले असुन त्यांना लवकरच ऍ़डव्हांन्स हप्त्याचे वाटप करणार आहोत. कारखान्याने मागील गळीत हंगामात 9,61,100 मे.टन ऊस गाळप करुन 9,55,590 क्वि.साखर पोती उत्पादित केलेली आहेत आणि आसवानी प्रकल्पातून 1.60 कोटी लिटर व को-जन प्रकल्पामधून 6.71 कोटी युनिट विज निर्मीती केलेली आहे. येणारा गळीत हंगाम 2023-24 हा कारखाना 9000 मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेने चालणार असून त्यासाठी कारखाना विस्तारीकरणाची कामे प्रगती पथावर आहेत. ती सर्व कामे वेळेत पुर्ण करुन ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीस कारखाना गाळपासठी सज्ज होईल. त्यामुळे येणाज्या या गळीत हंगामात कमी दिवसात जास्तीचे गाळप करण्याचा कारखाना व्यवस्थापणाचा मानस आहे. कारखान्याचे संस्थापक चेअरमन व पांडुरंग परिवाराचे सर्वेसर्वा श्रध्देय सुधाकरपंत परिचारक मोठे मालक यांनी घालुन दिलेल्या आदर्शानुसार कारखान्याची वाटचाल सुरु आहे.
यावेळी बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगीतले की, “कारखान्याने गत हंगामातील ऊसाची बिले, तो़डणी वाहतुक यंत्रणेची बिले वेळेवर दिली असुन कामगारांंचे पगार वेळेवर देत असुन कारखान्याकडे कोणत्याही प्रकारची बँकांची कर्जे थकीत नाहीत. कारखान्याची आर्थिक परिस्थिती सदृढ असुन येणारा गळीत हंगाम हा कारखान्याच्या दृष्टीने महत्वाचा असून या हंगामात कारखाना जास्तीच्या गाळप क्षमतेने चालणार आहे. मील, बॉयलर, ई.टी.पी. इत्यादीची कामे संबंधीत कंत्राटदार वेळेवर पुर्ण करणार आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी यंत्र सामग्री कारखाना कार्यस्थळावर येत आहे.”
यावेळी कारखान्याचे संचालक श्री. दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री.दिलीप चव्हाण, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.सुदाम मोरे, श्री.विजय जाधव, श्री.हणमंत कदम, श्री.किसन सरवदे, श्री. शामराव साळुंखे, श्री.राणु पाटील, तज्ञ संचालक श्री.दाजी पाटील, श्री.दिलीप गुरव व अधिकारी उपस्थित होते .