डॉ.सई भोरे-पाटील यांनी स्वीकारला अकलूज डीवायएसपी कार्यालयाचा पदभार
साधला पत्रकारांशी संवाद

साधला पत्रकारांशी संवाद
कायद्याच्या चौकटीत राहून सर्व सामान्य जनतेसाठी काम करणार-सई भोरे पाटील
अकलूज तालुका माळशिरस येथील अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.बसवराज शिवपुजे यांची नुकतीच बदली झाली आहे. त्यांच्या बदली नंतर उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सई भोरे-पाटील यांनी गुरुवार दिनांक 6 जुलै रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अकलूज येथे पदभार स्वीकारला. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत माळशिरस तालुक्यातील विविध प्रश्न जाणून घेतले. पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या “माझा हेतू अत्यंत प्रामाणिक आहे.जे जमतय ते करणार आणि जेवढं समाजासाठी करता येईल तेवढं करणार, गुन्हेगारांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, हा माझा प्रामाणिक हेतू असेल. कायद्याच्या चौकटीत राहून जनतेसाठी मी जे काही करता येईल ते करणार असून जनतेनेही सामाजिक व्यवस्थेचा आदर करावा असे ही डॉ.सई भोरे-पाटील म्हणाल्या.