सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
सहकार महर्षि गार्डनचे उद्घाटन व वृक्षारोपण

सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहकार महर्षि गार्डनचे उद्घाटन,वृक्षारोपण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न
संग्रामनगर (केदार लोहकरे) शंकरनगर-अकलूज येथील सहकार महर्षि शंकरराव मोहिते – पाटील इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी ॲण्ड रिसर्च या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये सहकार महर्षि गार्डन या बागेचे उद्घाटन व वृक्षारोपण महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी महाविद्यालय विकास समिती अध्यक्षा कु.स्वरूपाराणी जयसिंह माहिते-पाटील,संस्थेचे सचिव राजेंद्र चौगुले, महाविद्यालय विकास समिती सदस्य वसंतराव जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रविण ढवळे,कार्यालयीन अधिक्षक,सर्व विभागाचे विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीकामध्ये त्यांनी महाविद्यालयाची थोडक्यात माहिती दिली.तसेच जसे अकलूज ग्रामपंचायत ही आशिया खंडातील एक नंबरची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जात होती.त्याचप्रमाणे लवकरच सहकार महर्षि अभियांत्रिकी महाविद्यालय हे आशिया खंडातील एक नंबरचे महाविद्यालय म्हणून ओळखले जाईल असा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर महाविद्यालयातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांचेमार्फत घेण्यात आलेल्या मार्च-एप्रिल २०२३ च्या परीक्षेमधील गुणवंत विद्यार्थ्यामध्ये चि.शंकर गोसावी याचा विद्यापीठामध्ये मेकॅनिकल विभागातून व्दितीय क्रमांक व महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक, चि.अरूण दडस याचा विद्यापीठामध्ये इलेक्ट्रीकल विभागातून चतुर्थ क्रमांक व महाविद्यालयामध्ये प्रथम क्रमांक, कु.वैभवी मगर हिचा महाविद्यालयामधील कॉम्प्युटर सायन्स ॲन्ड इंजिनिअरींग विभागातून प्रथम क्रमांक,चि.संस्कार दोशी याचा महाविद्यालयामधील सिव्हील विभागातून प्रथम क्रमांक तसेच महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांचेमार्फत घेण्यात आलेल्या उन्हाळी परीक्षा २०२३ मध्ये चि.प्रसन्न भातलवंडे याचा पदविका कॉम्प्युटर विभागातून प्रथम क्रमांक मिळवीलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार महाविद्यालयाचे अध्यक्ष जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना जयसिंह मोहिते-पाटील म्हणाले की,अभियांत्रिकी महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर परदेशात जाऊन नोकरी करण्यापेक्षा देशात राहून उद्योजक बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या पारंपरिक तंत्रज्ञानाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत स्वनिर्मिती करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून महाविद्यालयाचे कार्यालयीन अधिक्षक शब्बीर शेख,सिव्हील विभागाचे विभागप्रमुख प्रा.सागर फुले,प्रथम वर्ष पदविका विभागप्रमुख प्रा.संजय झंजे यांनी काम पाहिले तसेच सुत्रसंचालक कु. मिनाक्षी राऊत तर आभार प्रदर्शन प्रा.श्रीकांत कासे यांनी केले .