घरा घरात,वाहनांत,माळशिरसच्या ३० कि.मि.परिसरात आवाज FM स्माईलचाच
पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा.

स्माईल एफ. एम.ची गरुडझेप भरारी.
ग्रामिण भागातूनही स्माईल एफ.एम. लोकांची सकाळ जागवतो | घरांत,वाहनांत माळशिरसच्या ३० कि.मि.परिसरात FM स्माईलचाच आवाज
अकलूज (संजय लोहकरे) मराठी माणुस उद्योग व्यावसायात यशस्वी ठरत नाही ही म्हण बागेचीवाडी-अकलूज येथील शंकर बागडे या मराठी माणसाने मोडीत काढली आहे.एफ.एम.रेडिओ हा शहरी व्यावसाय ग्रामीण भागात टाकून आणि यशस्वीरित्या चालवून दाखवून बागडे यांनी मराठी माणसाच्या मनात आदर्श निर्माण केला आहे.
एफ.एम.रेडिओ हा तसा कोणीही सहज न करता येण्या सारखा व्यावसाय.स्वतः एलआयसी एजंट व बागेचीवाडी गावचे पोलीस पाटील असणाऱ्या शंकर बागडे यांनी बागेचीवाडी सारख्या ग्रामीण भागात एक नवी वाट शोधली.अनेक कागदो पत्रांच्या अडचणींना सामोरे जात त्यांनी एफ.एम.रेडिओची जानेवारी २०२२ ला शासनाकडून परवानगी मिळवली.सेटअप उभारणे,रेडीओ जॉकी शोधणे असा सर्व प्रवास करत २ एप्रिल २०२२ रोजी स्माईल एफ. एम. सुरू झाले.
सध्या मोबाईलचा व सोशल मिडीयाचा जमाना असल्यामुळे सुरूवातीला एफ.एम.कडे सर्वांनीच दुर्लक्ष केले.परंतु शंकर बागडे यांनी हार मानली नाही.स्वतः सर्व व्यापारी,डॉक्टर,व्यावसायीक यांच्या गाठी भेटी घेऊन त्यांना एफ.एम.रेडिओच्या फायद्याविषयी माहिती करून दिली.मित्र मंडळींना एफ.एम.चे ॲप डाऊनलोड करायला लावले. हळुहळु सर्वांना त्याची गोडी लागली.त्यानंतर खऱ्या अर्थाने स्माईल एफ.एम.रेडिओ माळशिरस तालुका व परिसरात घरोघरी पोहोचले. आज अशी स्थिती आहे की,बहुतांश घरांतून, चारचाकी वाहनांतुन माळशिरस तालुक्याच्या ३० किलोमिटर परिसरातील ग्रामिण भागातूनही स्माईल एफएम लोकांची सकाळ जागवतो.
काल दि. २ एप्रिल रोजी स्माईल एफ.एम.चा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला.यावेळी उद्योगपती शिवतेजसिंह मोहिते-पाटील, बागेचीवाडीचे सरपंच कृष्णराज माने पाटील,संग्रामनगर ग्रामपंचायतीचे सरपंच अजित रेवंडे,प्राचार्य दत्तात्रय बागडे व मान्यवर उपस्थित होते.यावेळी शंकर बागडे यांच्या ५५ मित्रांनी स्वयंस्फुतींने रक्तदान केले. यावेळी बोलताना शंकर बागडे म्हणाले,स्माईल एफ.एम.च्या माध्यमातून लोकांपर्यंत सांस्कृतीक, सामाजिक, अध्यात्मीक,वैचारीक, आरोग्यविषयक माहिती पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.प्रतिसाद चांगला मिळत आहे.आणि लोकही उत्स्फुर्तपणे आमच्याशी संपर्क साधुन त्यांना हव्या असणाऱ्या कार्यक्रमांची मागणी करत आहेत.हेच आम्ही आमचे यश समजतो.