महाळुंग-श्रीपूर मराठा बांधवानी दिली रविवारी बंदची हाक | Mahalung-Shreepur
पूर्ण दिवसभर बाजारपेठा बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना केली विनंती

पूर्ण दिवसभर बाजारपेठा बंद ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांना केली विनंती
श्रीपूर तालुका माळशिरस येथील महाळुंग-श्रीपूर मधील सर्व मराठा समाजातील बांधवांनी, त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर सर्वांनी एकत्रित येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्वांची एकत्रित मीटिंग घेऊन रविवार दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी दिवसभर महाळुंग-श्रीपूर मधील सर्व व्यापार पेठा बंद ठेवण्यासंदर्भात सर्व व्यापाऱ्यांना विनंती करण्यात आली व सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले आहे. सर्व मराठा समाज बांधवांकडून अकलूज पोलीस स्टेशनला निवेदन देखील देण्यात आले आहे.
जालना (अंतरवाली-सराटी) या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलन कर्त्यांवरती पोलिसांनी लाठीचार्ज केल्याबद्दल,या घटनेचा निषेध करण्यासाठी सदर बंदची हाक देण्यात आली आहे.
रविवारी सकाळी 8.30 वाजता श्रीपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सर्व मराठा बांधव व त्यांना पाठिंबा देणारे सर्वजण एकत्रित येऊन निषेध व्यक्त करणार आहेत. अशी माहिती बैठकीमध्ये देण्यात आली आहे. परिसरामध्ये या घटनेच्या निषेधा संदर्भात सर्व मराठा बांधवांनी आपल्या मोबाईल स्टेटस वरती निषेदाचे बॅनर ठेवले आहेत.