महाराष्ट्र

प्रशांत क्रिडा महोत्सवाचा श्रीपूर मध्ये झाला शुभारंभ

क्रिडा महोत्सवाचे प्रक्षेपण लाईव्ह सर्वांना पाहता येणार

क्रिडा महोत्सवाचे प्रक्षेपण लाईव्ह सर्वांना पाहता येणार

श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गेले अनेक वर्षांपासून कामगारांमध्ये खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी, त्यांना मानसिक ताण येऊ नये, व्यायाम व्हावा, मन व शरीर प्रसन्न राहावे. कामगारांनी एकत्रित खेळल्याने त्यातुन सांघिक भावना व चैतन्य निर्माण होते,  या दृष्टीकोनातून प्रशांत क्रिडा महोत्सवाचे गेले सात वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे. आज कारखाना ऊस यार्ड मधील मैदानात भव्य दिव्य असे प्रशांत क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन युटोपियन शुगर्सचे चेअरमन उमेश परिचारक, अकलूज पोलीस स्टेशनच्या सहा.पोलीस निरीक्षक स्वाती सुरवसे मॅडम, जेष्ठ संचालक दिनकरभाऊ मोरे, दाजी पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते, कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करून  व क्रीडाध्वज फडकवून ‘प्रशांत क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.

क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ क्रिकेटच्या सामन्याने  करण्यात आला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना  कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले की, “या क्रिडामहोत्सवात क्रिकेट, सुरपाट्या, हॉलीबॉल, रस्सीखेच आदि र्स्पधांचे अयोजन केले असुन कामगारांनी एकत्रित खेळल्याने त्यातुन सांघिक भावना व चैतन्य निर्माण होते आणि आपुलकी निर्माण होते.” कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त कारखाना कामगार कल्याण मंडळाच्यावतीने प्रशांत क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर दोन दिवसाच्या क्रिडा स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण पांडुरंग कारखान्याच्या यूट्यूब चैनल वरती सर्वांना लाईव्ह पाहता येणार आहे. अशी माहिती कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

“श्रद्धेय कै.सुधाकरपंत परिचारक यांनी सांगितलेल्या रस्त्यावर आपण सर्वजण मिळून यशस्वी वाटचाल करत आहोत, तसेच मा.आ.प्रशांत परिचारक यांच्यासारखे कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व आपल्या सोबत असल्याने आज कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडूरंग कारखान्याचा सर्वच क्षेत्रांतील आलेख चढता आहे, सर्वांच्या उत्कृष्ट कामगीरीमुळे, आपल्या कारखान्याला राज्यपातळी व देशपातळीवरचे अर्ध शतकहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत”, असे मत युटोपियन शुगर्सचे अध्यक्ष व ‘पांडुरंग’चे संचालक उमेश परिचारक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी माजी चेअरमन दिनकरभाऊ मोरे, दाजी पाटील, संचालक बाळासाहेब यलमार, तानाजी वाघमोडे, प्रायोजक अमोंडिकर, दादासो पवार, विजय पाटील, सलीम अत्तार, नागनाथ मिसाळ ,विजय पाटील, अतुल जोशी, सचिन विभुते, तानाजी भोसले, प्रमोद पवार, एम आर कुलकर्णी, रवींद्र काकडे, संतोष कुमठेकर, सोमनाथ भालेकर, हनुमंत नागणे, अनंत कुलकर्णी, सोपान कदम, भिमराव बाबर यांच्यासह कारखान्याचे कामगार आणि श्रीपूर-महाळूंग परिसरातील नागरिक, प्रेक्षक मोठ्यासंख्येने उपस्थित होते. 

वाढदिवसानिमित्त पांडुरंग सायकल क्लबच्या वतीने महाळुंग येथे सायकल रॅली काढून महाळुंग मधील यमाई देवीच्या माकडांना केळीचे वाटप केले. पंढरपूर येथील पालवी संस्थेत अन्नदान, गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम यथे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे यांनी केले. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मा.आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!