12 वी इंग्लिशच्या पेपरमध्ये मोठी चूक | काही ठिकाणी प्रश्न ऐवजी उत्तर आले छापून.
विद्यार्थी,शिक्षक व पालकांमध्ये संभ्रम

21 फेब्रुवारी 2023 मंगळवार पासून बारावीच्या परीक्षा सुरु झाल्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या या परिक्षेच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पहायला मिळाला. बारावी इंग्लिश च्या पेपरमध्ये मोठी चूक झाली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्ना ऐवजी उत्तर छापून आले. प्रश्नपत्रिका हातात पडताच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
पहिलाच पेपर इंग्रजी विषयाचा होता. सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत हा पेपर होता. बारावीच्या इंग्रजी पेपर मध्ये प्रश्न ऐवजी उत्तर छापून आले. यामुळे शिक्षण मंडळाची चूक उघड झाली आहे.
आजच्या बारावी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले आहे. आता या प्रश्नाचे मार्क मिळणार का याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. तर, शिक्षण मंडळ या चुकीबाबात काय निर्णय घेणार याबाबत संभ्रम आहे.
पहिल्याच पेपरमध्ये सहा मार्कांची लॉटरी ?
इंग्रजी पेपर मधील प्रश्न क्रमांक 3 इंग्रजी कवितेववर आधारित आहे. पान नंबर 10, प्रश्न क्रमांक 3 , उप प्रश्न, A3 2 मार्क तपासणाऱ्याला सूचना दिली आहेत. प्रश्न ऐवजी A4 (2 मार्क) थेट उत्तर देण्यात आले आहे. कवितेवर आधारित प्रश्नचे हे उत्तर आहे.
A5 (2 मार्क) येथे तपासणाऱ्याला देण्यात येणाऱ्या सूचना देण्यात आल्या आहेत. या तिन्ही प्रश्नांमध्ये विद्यार्थ्यांनी नेमकं करायचं काय हा प्रश्न दिलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी हा प्रश्न सोडवण्यासंदर्भात संभ्रमात होते. अनेक शाळांमध्ये या संदर्भात सूचना सुद्धा देण्यात आल्या.
इयत्ता १२वी आजच्या इंग्रजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत Q3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी उत्तर छापले आहे. बोर्डाने प्रथमदर्शनी चूक मान्य केली आहे. पण, नियामकाचा अहवाल आल्यानंतर ज्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनाच ग्रेस मार्क देण्याचा निर्णय होईल अशी माहिती समोर आली आहे. बोर्डाकडून खुलासा करण्यात आला असून त्रुटींबाबत योग्य निर्णय जाहीर केला जाईल असं स्पष्टीकरण बोर्डाने जाहीर केले आहे. यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.