न्यू डायमंड स्कूल, महाळुंग-श्रीपूर | आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित
विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम वर्षभर राबविले

श्रीपूर तालुका माळशिरस येथील पांडुरंग बहुउद्देशीय संशोधन संस्था संचलित न्यू डायमंड स्कूलला मंथन फाउंडेशन, अहमदनगर च्या माध्यमातून जांबुवंत खोत (मंथन समन्वयक, माळशिरस) कडून आदर्श शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी नितीन कुदळे,नवनाथ नागणे, सचिन गुळवे,हेमंत बरडे, रोहिणी बरडे,नानासाहेब मुंडफणे उपस्थित होते. या स्कूलमध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या हिताचे उपक्रम वर्षभर राबविले जातात तसेच पालक आपले दैवत समजून, प्रत्येक विद्यार्थी अष्टपैलू घडवत, येणाऱ्या प्रत्येक अडचणी वरती मात करून शून्यातून विश्व निर्माण करत असलेली अशीही न्यू डायमंड स्कूल आहे.
संस्थापक हेमंत बरडे (सर) आणि सचिव रोहिणी बरडे (मॅडम),आणि त्यांचे सर्व कुटुंब तसेच शाळेच्या सर्व स्टाफच्या माध्यमातून आसपासच्या परिसरामध्ये शाळेचे उल्लेखनीय कामगिरी दिसत आहे. शाळेतील सर्व मुलांना अभ्यासासोबत,वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा,मैदानी,भाषण, डान्स,बुद्धिबळ,ॲथलेटिक्स, संगीत,कुस्ती आणि इतरही सर्व स्पर्धेत शाळेतील मुलं सहभागी होऊन विजयाच्या झेंडा फडकवत आहेत.
चालू वर्षी शाळेच्या माध्यमातून डायमंड फेस्टिवलचे अत्यंत छान प्रकारे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यस्तरीय डान्स कॉम्पिटिशन,सांप्रदायिक कार्यक्रम भजन,कीर्तन, खेळ पैठणीचा महिलांचा कार्यक्रम , मुलांच्या बौद्धिक विकास व्हावा म्हणून मार्केट डे तसेच शाळेतील सर्व मुलांचे विविध गुणदर्शनाचे सादरीकरण झाले.
या सर्व उल्लेखनीय शैक्षणिक कार्याची दखल घेत मंथन फाउंडेशन,अहमदनगर च्या माध्यमातून न्यू डायमंड स्कूल ला आदर्श शाळा म्हणून सन्मानित करण्यात आले. याबद्दल शाळेच्या संस्थापकांचे व सर्व शाळेच्या शिक्षकाचे परिसरातील पालकांकडून आणि ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.