महाराष्ट्र

अकलूज फार्मसी कॉलेजचे झाले नॅक मूल्यांकन

अकलूजच्या फार्मसी कॉलेजला नॅक समितीची भेट.

नॅक मूल्यांकनास सामोरे जाणारे सोलापूर जिल्ह्यातील पहिले फार्मसी कॉलेज

अकलूज (केदार लोहकरे) : अकलूज तालुका माळशिरस येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसीचे राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक) त्रिसदस्यीय समिती ६ व ७ ऑक्टोबरला फार्मसी कॉलेजला भेट दिली.उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाची पडताळणी तसेच गुणात्मकदृष्ट्या दर्जा देण्यासाठी भारत सरकारच्या अधिनस्थ व विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली संचालित बंगळुरू येथील नॅक कार्यालय द्वारा नियुक्त नॅक पिअर समिती गुणात्मकदृष्ट्या पडताळणी करून महाविद्यालयाला मानांकन देत असते.या नॅक पीअर टीमच्या अध्यक्ष्या डॉ.चामुंडेश्वरी दुराई पांडियन (तामिळनाडू), समन्वयक डॉ. गुरूप्रीत कौर (पंजाब) व सदस्य डॉ.पी.एन.मुर्ती (ओडिशा)यांचा समावेश होता. दि ६ ऑक्टोबर रोजी महाविद्यालयाच्या लेझिम संघाने  उत्साह पूर्ण वातावरणात महाराष्ट्रीयन पद्धतीने  स्वागत केले. 

नॅक मानांकनाच्या ठरलेल्या विविध निकषांनुसार महाविद्यालयातील विविध घटकांची पडताळणी करून कागदपत्रांची तपासणी केली. याप्रसंगी पालक तसेच माजी व आजी विद्यार्थी यांच्यासोबत सुसंवाद साधला तसेच महाविद्यालयीन प्रशासकीय कामकाजाची पडताळणीही केली.यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक यांच्या समवेत  संवाद साधून महाविद्यालयातील विविध सुविधाबाबत चर्चा केली.

यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सभापती विनोद दोशी, बाळासाहेब सणस,निशा गिरमे, वसंतराव जाधव,रामभाऊ गायकवाड, पांडुरंग (तात्या) एकतपुरे,सचिव अभिजीत रणवरे व सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील उपस्थित होते.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल भानवसे,आयक्यूएसी समनव्यक डॉ.मुकुंद गाडे यांच्या हस्ते समिती सदस्यांचा स्वागत करण्यात आला.समारोपाच्या वेळी नँक समितीच्या चेअरमन डॉ. चामुंडेश्वरी दुराई पांडियन (तामिळनाडू) यांनी महाविद्यालयातील सुविधाबाबत समाधान व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!