क.सुधाकरपंत परिचारक पांडुरंग स.साखर कारखान्याचे प्र.मे.टन 100 रु. प्रमाणे ऊस बिल बँकेत केले जमा
पहिल्या हप्त्या नंतरची ऊर्वरीत ऊस दराची देय रक्कम पोळा व दिपावली सणास अदा करणार

कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे प्रती मे.टन रु.100/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग.
पहिल्या हप्त्या नंतरची ऊर्वरीत ऊस दराची देय रक्कम पोळा सण व दिपावली सण या सणास अदा करणार, प्रती मे.टन एकूण रु.2500/- प्रमाणे ऊस बिलाची रक्कम अदा –
श्रीपूर तालुका माळशिरस येथे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम 2022-23 मध्ये गाळप केलेल्या ऊसास प्रती मे. टन रू.100/- प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ऊस बिलाची एकूण रक्कम रू.10 कोटी जमा केली आहे. कारखान्याने प्रत्येक वर्षी शेतक-यांना गरजेचे वेळी पैसे उपलब्ध करुन दिलेले आहेत. कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व. सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या आदर्शानुसार ”शेतकरी हिताय, कामगार सुखाय” या उक्ती प्रमाणे मोठया मालकांच्या आदर्शाचा वारसा कारखान्याचे चेअरमन मा.आ.श्री.प्रशांतराव परिचारक (मालक) जोपासत आहेत.
कारखान्याचे चेअरमन .प्रशांतराव परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली गळीत हंगाम 2022-23 अत्यंत उत्कृष्ठपणे चालला असून या हंगामात .प्रशांतराव परिचारक यांच्या सुयोग्य नियोजनामुळे गळीत हंगाम 2022-2023 मध्ये कारखान्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचा साखर उतारा मिळविला आहे. यावेळी बोलताना प्रशांतराव परिचारक यांनी सांगितले की या हंगामात आसवनी प्रकल्प व इथेनॉल निर्मीती प्रकल्प 90 के.एल.पी.डी. क्षमतेने चालला असून 1.78 कोटी लि. उत्पादन घेतले आहे. गाळप हंगाम 2022-23 मध्ये कारखान्याने 9.61 लाख मे. टन ऊस गाळप करून 11.50 टक्के सरासरी साखर उताऱ्याने 9.55 लाख क्विं. साखरेचे उत्पादन घेवून उद्दीष्ठपुर्ती केली आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या परंपरेप्रमाणे पहिल्या हप्त्या नंतरची ऊर्वरीत ऊस दराची देय रक्कम पोळा सण व दिपावली सण या सणास अदा करणेची आहे. परंतू या वर्षी अधीक महिना असल्या कारणाने पोळा सण सुमारे एक महिना पुढे गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ऊसाची मशागत, लागण करणेकरीता रक्कम उपलब्ध व्हावी म्हणून प्रती मे.टन रु.100/- प्रमाणे ऊस बिल संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अदा करणेत येत आहे. या पुर्वी कारखान्याने दिलेले प्रती मे.टन रु. 2400/- व आता अदा करीत असलेले प्रती मे.टन रु.100/- अशी एकूण रक्कम रु. 2500/- प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली असून ऊर्वरीत रक्कमही पोळा सण व दिपावली सणापुर्वी शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे अदा करणार आहोत. गळीत हंगाम 2023-24 मध्ये सभासद शेतकऱ्यांचा ऊस लवकरात लवकर गाळप व्हावा यासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविली असून हा हंगाम वेळेत सुरु करुन सर्व सभासद शेतकऱ्यांचा ऊस ठरवून दिलेल्या वेळीपुर्वी गाळप करणार आहोत. श्रध्देय मोठ्या मालकांनी घालुन दिलेली पोळा व दिपावली सणाची ऊस दर अदा करणेची परंपरा जोपासणेचे काम कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांनी सार्थपणे सुरु ठेवली असून शेतकरी हितास प्राधान्य दिलेले आहे.
यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.कैलास खुळे व संचालक श्री.दिनकरराव मोरे, श्री.वसंतराव देशमुख, श्री.उमेशराव परिचारक, श्री.दिलीपराव चव्हाण, श्री.ज्ञानदेव ढोबळे, श्री.तानाजी वाघमोडे, श्री.बाळासो यलमर, श्री.भगवान चौगुले, श्री.लक्ष्मण धनवडे, श्री.भास्कर कसगावडे, श्री.भैरू वाघमारे, श्री.गंगाराम विभुते, श्री.हणमंत कदम श्री.सुदाम मोरे श्री.विजय जाधव, श्री.किसन सरवदे, श्री.शामराव साळुंखे, श्री.राणू पाटील, तंज्ञ संचालक श्री.दाजी पाटील, श्री.दिलीप गुरव कारखान्याने कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.