महाराष्ट्र

लेखकाचे कान आणि डोळे नेहमी उघडे असले पाहिजेत – जयसिंह मोहिते पाटील 

ग्रामीण भागातील लेखकांसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध व्हावीत

लेखकाचे कान आणि डोळे नेहमी उघडे असले पाहिजेत – जयसिंह मोहिते पाटील

ग्रामीण भागातील लेखकांसाठी भव्य व्यासपीठ उपलब्ध व्हावीत

 अकलूज प्रतिनिधी  दि.१८ (केदार लोहकरे यांजकडून)
वाफेगांव (ता.माळशिरस) येथील लेखक संभाजी दिगंबर सरवदे यांनी लिहिलेल्या ” वावटळ ” या कादंबरीचे प्रकाशन सह‌कार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते वाफेगांव येथे मोठ्या दिमाखात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव व कवी डॉ.शिवाजी शिंदे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जयसिंह मोहिते पाटील म्हणाले की,समाजातील सर्वसामान्य लोकांना वाचण्याची आवड लावण्याची जबाबदारी लेखकाची आहे म्हणून लेखकाने आपले कान आणि डोळे नेहमी उघडे ठेवले पाहिजेत.पूर्वीच्या लोकांना वाचण्याची आवड होती.आता लेखकांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी केला पाहिजे तसेच जयसिंह मोहिते पाटील यांनी वि.स.खांडेकर,द. मा.मिराजदार,बाबासाहेब पुरंदरे अशा जुन्या काळातील नावाजलेल्या लेखकांचा उल्लेख आपल्या भाषणात केला त्यांनी वाफेगांव सारख्या ग्रामीण भागातील वावटळ कादंबरीचे लेखक संभाजी दिंगबर सरवदे यांचे तोंड भरून कौतुक केले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सुप्रसिद्ध लेखक डॉ.ज्ञानेश्वर जाधवर,काॅटनकिंग कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट खंडू गायकवाड,प्रसिद्ध शिवकालीन इतिहासाचे व्याख्याते अशोक गायकवाड यांनी आपली मनोगत व्यक्त केली.या प्रकाशन सोहळ्यासाठी सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे-पाटील,शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक नारायण भाऊ फुले,प्रसिद्ध लेखक अशोक नजान,समिक्षा पब्लिकेशन पंढरपूरचे प्रविण भाकरे, ॲड.आकाश लोंढे,विनायक पराडे पाटील,प्रा.रामचंद्र सावंत,बलभीम गायकवाड, विठ्ठल गायकवाड,कुंडलिक गायकवाड,शिवराज शिंदे पाटील, शिवाजी गायकवाड,महेन्द्र खिलारे,महावीर हेंबाडे,अजय मदने,लखन शेंडगे,योगेश गायकवाड,नागनाथ सरवदे, दत्तात्रय हेंबाडे,दत्तात्रय चव्हाण,
अमोल शिंदे,सरपंच सौ.विजया एकनाथ शिंदे,सौ.मंदाकिनी प्रकाश लोंढे,अरूण शिंदे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाजी माने गुरूजी यांनी केले तर आभार प्रदर्शन संगमेश्वर शिंदे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!