महाराष्ट्र

श्री चंद्रशेखर विद्यालय,श्रीपूर 1992-93 बॅच माजी विद्यार्थी पुनर्मिलन | SCV SSC Shreepur

माजी विद्यार्थी मेळावा 2025 SSC SCV SHREEPUR

“माजी विद्यार्थ्यांचे पुनर्मिलन हे फक्त मेळावे नसतात; ते सामायिक अनुभवांचे, प्रेमळ आठवणींचे आणि वर्गाबाहेर आपल्याला एकत्र बांधणाऱ्या चिरस्थायी बंधांचे उत्सव असतात.”

माजी विद्यार्थ्यांचा मेळावा SCV Shreepur-SSC-1992-93 to 2025 आठवणी आणि मजेदार  उपक्रमांचे पुनर्मिलन

Datta Naiknaware [9421075931] Reporter : श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय इयत्ता दहावी 1992-93  बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा 33 वर्षाच्या प्रदिर्घ भेटी नंतर व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यामधून  जुन्या आठवणी ताज्या करत  श्रीपूरच्या शाळेमध्ये आणि चिंचणी ग्रामीण कृषी पर्यटन केंद्र, चिंचणी, ता.पंढरपूर,जि.सोलापूर येथे रविवारी 9 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाला.

सकाळी लवकरच सर्वजण श्रीपूरच्या श्री चंद्रशेखर विद्यालय प्रशालेच्या प्रांगणात जमा होवून शाळेतील कै.चंद्रशेखर आगाशे साहेबांच्या पुतळयास अभिवादन करुन 33 वर्षापूर्वी  इयत्ता दहावी मध्ये शिकत असणारा जो वर्ग होता, त्यावर्गामध्ये प्रत्येक जण आपल्या जुन्या बेंचवरती बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

त्यानंतर सर्वजण चिंचणी, ता.पंढरपूर,  येथे स्नेह मेळाव्याच्या ठिकाणी रवाना झाले. त्यामध्ये प्रथम चिचंणी गावात प्रवेश करताना महाराष्ट्रीयन पध्दतीन हालग्या, घुमके, सनजई वाद्य वाजवून  उपस्थित वर्गमित्र, मैत्रिणींचे स्थानिक विद्यार्थ्यांकडून स्वागत करण्यात आले. सर्व मुला-मुलींना फेटा बांधून वाजत गाजत महाराष्ट्राची शान  लेझीम, हलगी व सनईच्या तालावर सर्वांनी ठेका धरून प्रदीर्घ विश्रांतीनंतरच्या भेटीचा आनंद घेतला. त्या नंतर कार्यक्रम  हॉलमध्ये बसून सर्वांनी आप-आपली  ओळख करुन दिली.

सर्वांनी ऊसाचा रस व हुर्डा पार्टीचा मनमुराद आस्वाद घेतला. सोबत थंडगार मठ्ठा पण होता. अत्यंत निसर्गरम्य वातावरणात आनंदाच्या डोहात सर्व मित्र-मैत्रिणी न्हावून गेले होते. त्यामध्ये कोणी ग्रुप डान्स केला, तर कोण वैयक्तीक डान्स केला, संगित खुर्ची खेळत त्याबरोबर मराठमोळ्या गाण्यावर थिरकत संगित खुर्चीचा आनंद घेतला. हे सर्व करत असताना सर्वजण आपले सुखदुःख विसरून बालपणीला उजाळा देत होते. 

समारोपच्या वेळी ग्रुप फोटो व पेढा त्याच ठिकाणी सर्वांना श्रीचंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे क.महाविद्याल श्रीपूरचे  विद्यमान प्राचार्य  पांडुरंग बनसोडे सर यांचे हस्ते वाटप करण्यात आला. स्नेह मेळावा पार पाडण्याकरीता अजीम मुलाणी, संजय पवार, गौतम लोंढे, प्रकाश काळे यांनी परिश्रम घेतल्या बद्दल प्राचार्य बनसोडे सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार  करण्यात आला. दिवसभराच्या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दशरथ मोहिते यांनी केले तर आभार. अजिम मुलाणी यांनी मानले.

माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे मुख्य आकर्षण म्हणजे निःसंशयपणे भव्य दुपारचे जेवण, हुरडा पार्टी होते, जिथे माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शालेय आणि कॉलेजच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. जुन्या मित्रांनी किस्से सांगितले आणि त्यांच्या जीवनाबद्दल आणि कारकिर्दीबद्दल अपडेट्सची देवाणघेवाण केली. तेव्हा हुरडा पार्टीमध्ये हास्य आणि गप्पांनी अधिक रंगत आली.

SCV Shreepur-SSC-1992-93 to 2025 मधील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा हास्य, सौहार्द आणि प्रेमळ आठवणींनी भरलेला एक जबरदस्त यशस्वी कार्यक्रम होता. आकर्षक खेळांपासून ते मनापासूनच्या संभाषणांपर्यंत, संगीताच्या तालावरील नाच गाणे या कार्यक्रमात पुनर्मिलन आणि सौहार्दाची भावना होती. माजी विद्यार्थी गोड आठवणी आणि नूतनीकरण केलेल्या संबंधांसह निघून जात असताना, हा कार्यक्रम SCV Shreepur-SSC-1992-93 to 2025 मधील त्यांच्या काळात निर्माण झालेल्या चिरस्थायी बंधांचा पुरावा म्हणून काम करत होता. हा खरोखरच सर्वांसाठी एक संस्मरणीय अनुभव होता, जो शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी सामायिक केलेल्या समुदायाची आणि अभिमानाची तीव्र भावना पुन्हा एकदा बळकट करत होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!