श्रीपूर मध्ये दांडीया प्रशिक्षणाचा शुभारंभ | Dandiya 2023 | Mahalung-Shreepur
महिला व मुलींचा उत्स्फुर्त प्रतिसाद | नगरसेविका शारदा पाटील यांचे कार्यक्रमासाठी सहकार्य

नवरात्र उत्सवांमध्ये यमाई देवीमंदिर,महाळुंग परिसरामध्ये एका सायंकाळी सर्वजण दांडीया खेळणार
श्रीपूर तालुका माळशिरस येथे घटस्थापना व नवरात्र उत्सवा निमित्त गेले तेरा वर्षापासून महाळुंग-श्रीपूर परिसरामध्ये दांडिया चे प्रशिक्षण महिला आणि मुलींना मोफत दिले जाते. यावर्षी महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत प्रभाग 14 च्या नगरसेविका शारदा नामदेव पाटील, शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान, कर्तव्य सामाजिक सेवाभावी संस्था आणि श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील सर्व मुलींना महिलांना मोफत दांडीया चे प्रशिक्षण देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
या कार्यक्रमाचा शुभारंभ क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व देवी महालक्ष्मीच्या प्रतीमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी नगरसेविका शारदा पाटील, नगरसेविका सविता रेडे, ज्योती रेडे, वीरपत्नी सुरेखा जाधव, इंदुमती पाटील, सचिव सारिका नाईकनवरे, दिपाली पाटील, प्राचार्य पांडुरंग बनसोडे, प्रशिक्षक हेमंत पाटील, नामदेव पाटील, शिरीष खोत, सागर पाटील, धर्मेश जाधव, दत्ता नाईकनवरे, आबा कांबळे, अंजली माने या मान्यवरांच्या शुभ हस्ते द्वीप प्रज्वलन करून करण्यात आला.
“प्रशिक्षण संपल्यानंतर नवरात्र उत्सवांमध्ये महाळुंग यमाई देवीमंदिर परिसरामध्ये नवरात्रीच्या एका सायंकाळी सर्व दांडीया खेळाडू खेळणार आहेत. गेले तेरा वर्षांपासून शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान व बहुउद्देशीय संस्था वेगवेगळे सामाजिक उपक्रम परिसरामध्ये राबवित असते. या वर्षी मुलींचा आणि महिलांचा दांडीया प्रशिक्षणासाठी मोठा प्रतिसाद आढळून आला आहे. नगरसेविका शारदा पाटील यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले आहे”- सुरेखा जाधव, अध्यक्षा-शहीद निवृत्ती जाधव प्रतिष्ठान.