सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर
अकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टचे वतीने पुरस्कार जाहीर

अकलूज येथील श्री विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर
अकलूज (केदार लोहकरे) : विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य या पुरस्कारासाठी राज्यातील साहित्यिकांना साहित्यकृती ट्रस्टकडे पाठवण्याचे आवाहन ट्रस्टचे कार्याध्यक्ष आ.रणजितसिंह मोहिते -पाटील आणि प्रताप क्रिडा मंडळाच्या व साहित्यकृती पुरस्कार समितीच्या अध्यक्षा कु.स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी केले होते, त्या आवाहनास महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये कादंबरी,कविता,कथासंग्रह, चरित्र ग्रंथ,ललितलेख,समीक्षा ग्रंथ,आध्यात्मिक ग्रंथ,ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ असे 250 हून अधिक साहित्यिकांचे साहित्य प्राप्त झाले.त्यामधून साहित्य पुरस्कार समितिने पुरस्काराचे स्वरूप व्यापक करीत खालील साहित्यिकांना पुरस्कार जाहीर केले आहेत.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील विशेष साहित्य पुरस्कार अच्युत गोडबोले यांना जाहीर करण्यात आला.अच्युत गोडबोले हे तंत्रज्ञ, समाजसेवक,मराठीतील लेखक आणि प्रसिद्ध वक्ते आहेत. विज्ञान,संगणक,तंत्रज्ञान आणि व्यवसाय या विषयांवर त्यांनी प्रामुख्याने लेखन केले आहे. अच्युत गोडबोले यांनी अर्थात अनर्थ विकासनीती,सर्वनाशाच्या उंबरठ्यावर,जीनिअस अलेक्झांडर फ्लेमिंग,जीनिअस अल्बर्ट आईनस्टाईन,जीनिअस आयझॅक न्यूटन,जीनिअस एडवर्ड जेन्नर कॅनव्हास,किमयागार, गणिती,जीनिअस गॅलिलिओ गॅलिली, गुलाम स्पार्टाकस ते ओबामा,झपूर्झा-भाग १,२,३ जग बदलणारे १२ जीनिअस,थैमान चंगळवादाचे,नॅनोदय(नॅनोटेक्नॉलॉजीविषयक),नादवेध (संगीतविषयक), बखर संगणकाची, बोर्डरूम, मनकल्लोळ भाग १ व २,मुसाफिर (आत्मकथन),जीनिअस मेरी क्युरी,जीनिअस जे.रॉबर्ट ओपेनहायमर,रक्त,लाईम लाईट,विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा,लुई पाश्चर,संगणक युग,संवाद,स्टीव्ह जॉब्ज : एक झपाटलेला तंत्रज्ञ अशी अनेक पुस्तके लिहलेली आहेत या सर्व साहित्याचा विचार करून त्यांना विशेष साहित्यकृती पुरस्कार देणेत येणार आहे.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील ललित साहित्यकृती पुरस्कार डॉ.यशवंत पाटणे,सातारा यांना जाहीर करण्यात आला.देवदूताच्या कथा-ललित कथा संग्रह २०२०, सहावे सुख ललित लेख संग्रह २०२२,चैतन्याचे चांदणे व्यक्तिचित्रण लेख संग्रह २०२२,चंदनाचे हात ललित लेख संग्रह २०२२,सुंदर जगण्यासाठी ललित लेख संग्रह २०२२,उद्याच्या आनंदासाठी ललित लेख संग्रह २०२२ या साहित्यसाठी ललित साहित्य कृती यांचा विचार करून त्यांना ललित साहित्यकृती पुरस्कार देणेत येणार आहे.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील काव्य साहित्यकृती पुरस्कार डॉ.राजेंद्र दास कुर्डुवाडी यांना जाहीर करण्यात आला.त्यांची पुस्तके ‘इमान’ (काव्यसंग्रह) ‘शब्द भेटण्याच्या वयातच (काव्यसंग्रह) ‘कोसळेपर्यंत’ (काव्यसंग्रह) सद्गुरु जीवनदर्शन’ (चरित्र) घर आलं का ? काळोख पहाटेपूर्वीचा ‘उतरलेली उन्हें ( संचार सोलापूर या पुरवणीत) हे ललित लेखनाचे सदर,सोलापुरी विचार’ व ‘दारागिरी सदरे या साहित्याचा विचार करून त्यांनी लिहिलेल्या तुकोबा या काव्य संग्रहास काव्य साहित्यकृती पुरस्कार देण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेत ट्रस्टचे कार्याध्यक्ष आमदार रणजितसिंह मोहिते -पाटील व पुरस्कार निवड समितीच्या व प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. यावेळी बोलताना स्वरुपाराणी मोहिते -पाटील यांनी सांगितले की सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील हे विविधांगी व्यक्तिमत्व होते.त्यांचे अनेक साहित्यिक,विचारवंत, लेखक व वक्ते यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या कार्याची ही परंपरा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा श्री.विजय गणेशोत्सव मंडळ पब्लिक ट्रस्टचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सुरू ठेवली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाखाली १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सहकार महर्षी शंकरराव मोहिते -पाटील राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहे.या पुरस्काराचे वितरण जेष्ठ साहित्यिक आणि महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे यांचे शुभहस्ते आणि मा. विजयसिंह मोहिते पाटील यांचे अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमासाठी राजसिंह मोहिते-पाटील,जयसिंह मोहिते-पाटील,मदनसिंह मोहिते-पाटील,आ.राम सातपुते,धैर्यशील मोहिते-पाटील,संग्रामसिंह मोहिते-पाटील,सत्यशील मोहिते-पाटील,अर्जुनसिंह मोहिते-पाटील,शिवतेजसिंह मोहिते- पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे कु.स्वरुपाराणी मोहिते -पाटील यांनी सांगितले.
सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार वितरण समारंभ बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता स्मृतीभवन शंकरनगर याठिकाणी संपन्न होणार आहे.
या पत्रकार परिषदेस ट्रस्टचे अध्यक्ष माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील,उपाध्यक्षा नंदिनीदेवी मोहिते-पाटील,सचिव अभयसिंह माने-देशमुख,संचालक चंद्रकांत कुंभार,श्रीकांत राऊत,संचालिका फातिमा पाटावाला आदी उपस्थित होते.
विशेष पुरस्कार स्वरूप : रुपये ५००००, सन्मानचिन्ह , ललित आणि काव्य साहित्यकृती पुरस्कार रुपये प्रत्येकी २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह , शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.