कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह.साखर कारखान्याच्या 6,11,111 व्या साखर पोत्याचे पूजन
गैरसोय होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घेवून शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप केला-डॉ.यशवंत कुलकर्णी

उदीष्टपेक्षाही जास्तीचे गाळप कारखाना करणार- चेअरमन .प्रशांतराव परिचारक
गैरसोय होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घेवून शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप केला-डॉ.यशवंत कुलकर्णी
श्रीपूर तालुका माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम 2023-24 मध्ये उत्पादित झालेल्या 6,11,111 व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, उमेशराव परिचारक, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी व अधिकारी उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन .प्रशांतराव परिचारक म्हणाले, ” कारखान्याचा गळीत हंगाम 2023-24 हा सुरळीत सुरु आहे. कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. गळीत हंगाम 2023-24 मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास चांगला दर देत असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू गळीत हंगाम 2023-24 मध्ये विस्तारीकरण केलेमुऴे प्रतीदिन 8.000 मे.टनापर्यंत ऊस गाळप करीत आहोत. शासनाने सिरप ते इथेनॉल वर बंदी आणलेमुळे कारखान्याचे सुमारे 1200 ते 1500 मे.टन ऊस गाळप कमी होत आहे. तरीही कारखान्याने सभासदांचे नुकसान होवू नये म्हणून इतर कारखान्यास ऊस देणेचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर गाळप करीत आहोत. या हंगामात कारखान्याचे 10 लाख मे.टन ऊस गाळपाचे उदीष्ट होते परंतू उदीष्टपेक्षाही जास्तीचे गाळप कारखाना करणार आहे. कारखान्याचा को-जन प्रकल्प, आसवानी प्रकल्प वाढीव क्षमतेने चालत आहेत.”
यावेळी कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी म्हणाले, “कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी ऊसाच्या लागवडी मोठ्या प्रमाणात आडसाली केल्या होत्या, त्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊसतोडी वेळेवर करणे व ऊस उत्पादकांची ऊस तोडणीसाठीची गैरसोय होणार नाही याची काळजी व्यवस्थापनाने घेवून शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळप केला आहे. अवकाळी पावसामुळे ऊसाच्या उत्पादनात 10 टक्के पर्यंत वाढ झालेमुळे ऊस उत्पादकांचा ऊसाचे टनेजमध्ये वाढ झाली आहे. या हंगामात कारखान्याने 84 दिवसात 6,01,588 मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी 11.02 टक्के साखर उताऱ्याने 6,11,111 क्विं. पोती साखर उत्पादन केले आहे.”
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, .भगवान चौगुले, .लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, .गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, .विजय जाधव, .किसन सरवदे, .शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव, कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.



