मराठा व्यावसायिक संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. नितीनराव खराडे यांची एकमताने निवड.
उपाध्यक्षपदी युवा उद्योजक विशाल गोरे

श्रीपूर, ता. 29: मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. नितीनराव खराडे यांची तर, उपाध्यक्षपदी युवा उद्योजक विशाल गोरे यांची एकमताने निवड करण्यात आली.
मराठा व्यावसायिक कल्याणकारी संघटना ही मराठा व्यावसायिकांची माळशिरस तालुका स्तरावर कार्यरत असलेली संघटना आहे. मराठी क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर या संघटनेची स्थापना झाली आहे. व्यावसायिक स्तरावरील विविध उपक्रमांसोबतच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात ही संघटना नेहमीच अग्रेसर राहिली आहे. संघटनेच्या कार्यकारिणीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, संघटनेची वार्षिक सभा पार पडली होती. त्यानंतर, नवीन कार्यकारणी नियुक्तीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत ऍड. नितीन खराडे, डॉ. राजीव राणे, डॉ. सुरेश सुर्यवंशी, दिलीप माने, नितीन इंगवले-देशमुख, मनोज गायकवाड, नवनाथ अप्पा सावंत, रामचंद्र चव्हाण, गणेश महाडिक, कुंडलिक गायकवाड, विठ्ठल गायकवाड, प्रा. धनंजय देशमुख, विशाल गोरे, इंद्रजीत नलवडे यांची संचालक पदी फेरनिवड करण्यात आली. तर, विक्रम माने, जगदीश कदम, योगेश देशमुख यांचा नवीन कार्यकारणीत समावेश करण्यात आला. या नवीन कार्यकारिणीच्या पार पडलेल्या बैठकीत, संघटनेच्या अध्यक्षपदी ऍड. खराडे, उपाध्यक्षपदी श्री गोरे, सचिव पदी प्रा. धनंजय देशमुख सहसचिव पदी युवा उद्योजक इंद्रजीत नलवडे यांची एकमताने निवड करण्यात आली. डॉ. राजीव राणे, संघटनेचे पूर्व अध्यक्ष नवनाथ आप्पा सावंत आणि मान्यवरांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री सावंत श्री चव्हाण, मनोज गायकवाड, कुंडलिक गायकवाड, विठ्ठल गायकवाड, प्रा. देशमुख, श्री गोरे, ऍड. खराडे यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेला अधिक गतिमान आणि क्रियाशील करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. श्री चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गणेश महाडिक यांनी उपस्थितांचे आभार मानले.