प्रा.सुधाकर कांबळे ‘उत्कृष्ट स्काऊटर’ पुरस्काराने सन्मानित | Best Scouter awarded Prof. Sudhakar Kamble
शिक्षणाधिकारी सुलभा वठारे मॅडम यांच्या शुभ हस्ते पुरस्कार प्रदान

श्रीपूर तालुका माळशिरस येथील श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायणकाका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक सुधाकर कांबळे सर यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्काऊटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग सोलापूर व सोलापूर भारत स्काऊट आणि गाईड शहर जिल्हा संस्था सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील कब बुलबुल व स्काऊट गाईड वार्षिक जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने उद्घाटन व वार्षिक बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन मंगळवार दिनांक 26 डिसेंबर 2023 रोजी सकाळी अकरा वाजता श्री रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी करण्यात आलेले होते. स्काऊट गाईड चळवळीचे महत्त्व व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडन पॉवेल यांनी चालू केलेल्या चळवळीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात येते या मेळाव्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील जवळपास बाराशे विद्यार्थी कब आणि बुलबुल स्काऊट व गाईड उपस्थित होते या मेळाव्यामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना विविध कृती कार्यक्रमांमध्ये गुंतवून ठेवले जाते त्यातून विद्यार्थ्यांना स्वयं शिस्त स्वयं अध्ययन त्याचबरोबर इतरांप्रती आदर व समाजसेवा अशा विविध कृती विद्यार्थी करत असतात.
उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिक्षणाधिकारी (नियोजन) श्रीमती सुलभा वठारे मॅडम यांच्या हस्ते प्रा. सुधाकर कांबळे यांना शैक्षणिक वर्ष 2022 -23 यावर्षीचा उत्कृष्ट स्काऊटर पुरस्कार देण्यात आला या कार्यक्रमास करमाळ्याचे गटशिक्षणाधिकारी पाटील साहेब, मंगळवेढ्याचे गटशिक्षण अधिकारी लवटे साहेब व पंढरपूरचे गटशिक्षणाधिकारी लिगाडे साहेब, विविध केंद्रातील केंद्रप्रमुख व करकंबच्या प्रथम नागरिका (सरपंच) सौ पांढरे मॅडम, ग्रामविकास अधिकारी श्री चव्हाण साहेब, सोलापूर जिल्हा स्काऊट संघटक श्रीधर मोरे, श्री शंकर यादव सर, जिल्हा ट्रेनिंग कमिशनर श्री पठाण सर, श्री प्रवीण कुंभार सर, मेळावा प्रमुख व आयोजक श्री कदम सर व श्री चंद्रशेखर विद्यालय व नारायण काका आगाशे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री बनसोडे सर, संस्था मान्य पर्यवेक्षक सिताराम गुरव सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख सुनील गवळी सर, शिक्षक शिक्षकेतर बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या कार्याबद्दल आबासाहेब देशमुख चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रामदास देशमुख साहेब, संस्थेच्या उपाध्यक्ष शुभांगी देशमुख मॅडम, सचिव भारत कारंडे साहेब यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.पुरस्कार मिळाल्याबद्दल प्राध्यापक सुधाकर कांबळे सरांचे सोशल मीडिया वरती अभिनंदन केले जात आहे.