कै.यश कोठारी यांचा स्मृतीदिन विविध उपक्रमांनी साजरा | 106 रक्तदात्यांनी केले रक्तदान
रक्तदान शिबीर, दंत तपासणी, व व्हॉलीबॉल स्पर्धा

कै.यश कोठारी यांची पुण्यतिथी रक्तदान शिबीर, दंत तपासणी, व्हॉलीबॉल स्पर्धा या सामाजीक उपक्रमाने साजरी !
श्रीपूर मध्ये 106 रक्तदात्यांनी केले रक्तदान
श्रीपूर ता.माळशिरस येथील ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरीचे मालक दीपक कोठारी यांचे धाकटे चिरंजीव कै.यश कोठारी यांची ९ वी पुण्यतिथी कारखान्यामध्ये सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. यावेळी ब्रिमा सागर चे अधिकारी, कामगार व परिसरातील नागरिकांनी 106 बॉटल रक्तदान केले. व मोफत दंत तपासणी शिबिरामध्ये ५० कामगारांची दंत तपासणी करण्यात आली.
प्रथम कै.यश कोठारी यांच्या प्रतिमेचे पूजन ब्रिमा सागर कारखान्याचे डायरेक्टर उदय कोठारी, डॉ. संजय सिद, डॉ. संतोष खडतरे, डॉ सुधीर पोफळे, डॉ. प्रमोद पवार, डॉ. निसार अहमद सय्यद, कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डे.मॅनेजर चंद्रकांत भागवत , नरेश पाठक, जयंत अरगडे,सुरक्षा अधिकारी भागवत पारसे, यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले व सर्वांनी यावेळी कै.यश कोठारी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ संतोष खडतरे व डॉ सुधीर पोफळे यांनी मनोगत व्यक्त केले. सायंकाळी व्हाॅलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन डायरेक्टर उदय कोठारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड श्रीपूर व सहकार महर्षी शंकराव मोहिते पाटील ब्लड बँक अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी डायरेक्टर उदय कोठारी, जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत, नरेश पाठक, जयंत आरगडे , डॉ संजय सिद, डॉ संतोष खडतरे, डॉ सुधीर पोफळे, डॉ प्रमोद पवार, डॉ निसार अहमद सय्यद, सल्लागार टी पी बाक्षी, सतीश डिंगरे, भारत ढेरे, सुकुमार मंडल, धनंजय कुलकर्णी, निवृत्ती पवार, राहुल किरपेकर, अजय शुक्ला, अमित तळवळकर, अरविंद इंगळे, सुरक्षा अधिकारी भागवत पारसे, टाईम कीपर नानासाहेब केचे, सुरेश इंगळे, सत्यजित पाटील, हेमंत पाटील, अफजल शेख, शामराव भोसले, बी टी शिवशरण, अनिल नाईकनवरे, बापु पोळके, बाळासाहेब कमते, प्रसाद अक्कलकोटकर, रवींद्र नाईकनवरे, मान्तेश वाल्हेकर, राष्ट्रीय साखर कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी नितीन बेनकर, खजिनदार राजेंद्र होनमाने, ब्रिमासागर इंटक युनियनचे सर्व पदाधिकारी, कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सत्यजित पाटील यांनी केले व आभार हेमंत पाटील यांनी मानले.