शेतकऱ्यांनी शेती सोबत शेती पूरक व्यवसाय करावेत-डॉ. बसवराज रायगोंड
विकसित कृषी भारत रथ निमित्ताने कृषी शास्त्रज्ञांची वाघोली गावाला भेट

वाघोली तालुका माळशिरस येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र मोहोळ, कृषी विभाग माळशिरस, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर व भरड धान्य केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित कृषी भारत रथ निमित्ताने शास्त्रज्ञांनी वाघोली येथे भेट दिली. या कार्यक्रमादरम्यान गावचे सरपंच अमोल मिसाळ, उपसरपंच पंडित मिसाळ, योगेश माने शेंडगे, तुषार पाटोळे , कालिदास मिसाळ भारत शेंडगे, शिवाजी शेंडगे दिगंबर शेंडगे जगदिश मिसाळ सतिश मिसाळ इत्यादि गावकरी मंडळी उपस्थित होती.
डॉ.बसवराज रायगोंड यांनी केळी प्रक्रिया उद्योगास सोबत भरडधान्य प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे लोकांना आवाहन केले त्या अनुषंगाने वाघोली गावच्या शेतकरी बांधवांनी भरड धान्याचे ओळख व त्यापासून बनविता येणाऱ्या प्रक्रिया उद्योगासंदर्भात विचारणा केली व उत्साहाने माहिती जाणून घेतली.डॉ.स्वाती कदम यांनी ऊस पाचट व्यवस्थापन तंत्रज्ञानाविषयी शेतकऱ्यांना अवगत केले तसेच डॉ.पिंकी रायगोंड मॅडम यांनी डाळिंब पिकातील मर रोग डॉक्टर बसवराज रायगोंड यांनी केळीतील विषाणू व्यवस्थापना विषयी मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमाप्रसंगी डॉ .विशाल वैरागर यांनी जलतारा योजने चा लाभ घेण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.तानाजी वाळकुंडे यांनी केले तसेच दुभत्या जनावरांची काळजी कशी घ्यावी व उपाय योजनेवर चर्चा केली.या कार्यक्रमात विविध योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी विज्ञान केंद्र मोहोळ येथील डॉ सूरज मिसाळ गावकऱ्यांना सध्य परिस्थिती व हवामान बदल याविषयी माहिती देऊन उद्बोधित केले.
यावेळी सर्व शास्त्रज्ञांचा ग्रामपंचायत वाघोली तर्फे सत्कार करण्यात आला. तुषार अहिरे व समस्त कृषी विज्ञान केंद्रातील कर्मचारी तसेच कृषी विभागातील कर्मचारी, वाघोली ग्रामपंचायत कर्मचारी, गावकरी यांनी विशेष परिश्रम घेतले.