आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत पांडुरंग स्पोर्ट्स अकॅडमी, श्रीपूरला सात पदके
चार सुवर्ण ,एक रोप्य व दोन कांस्य पदक

श्रीपूर तालुका माळशिरस येथील पांडुरंग स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडू स्पर्धकांनी शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडिया द्वारे मनोहर परिकर स्टेडियम मडगांव, गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत आपापल्या वयोगट व वजन गटांमध्ये कुमीते विभागात आपल्या कराटे खेळाचे विशेष प्राविण्य दाखवून चार सुवर्ण, एक रोप्य व दोन कांस्य अशा सात पदके पटकविले आहेत. यामध्ये राजवीर गायकवाड, प्रिशा खरात, .रिद्धी अभंगराव, राजनंदिनी गायकवाड (सुवर्णपदक), पारस दोशी( रौप्य पदक) ईशान तांबोळी ,अथर्व ताकतोडे (कास्यपदक )
कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक व कामगार कल्याण मंडळाचे मार्गदर्शक डॉ .यशवंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री पांडुरंग क्रीडा संकुलामध्ये हे विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना मुख्य कराटे प्रशिक्षक महादेव ताकतोडे हे प्रशिक्षण देत असून या यशाबद्दल पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुधीर पोफळे सचिव सोपान कदम कामगार युनियनचे विजय पाटील सर्व अधिकारी, कामगार व पालक यांनी विजयी स्पर्धकांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या..!