महाराष्ट्र

अकलूज येथे जीपीकाॅन २०२४ चे आयोजन.

अपत्यप्राप्ती साठी यशस्वी उपचार 

अकलूज  (केदार लोहकरे ) तालुका माळशिरस मधील निमा संघटना, होमिओपॅथी संघटना तसेच अकलूज आय व्हि एफ सेंटर यांच्या संयुक्त जीपीकाॅन २०२४ चे आयोजन कृष्णप्रिया हॉल येथे करण्यात आले होते.अकलूज आयव्हीएफ सेंटरचे हे गेली 5 वर्ष ग्रामीण भागामध्ये ज्यांना अपत्य होत नाहीत अशा अनेक पेशंटला अपत्यप्राप्ती व्हावी यासाठी यशस्वी उपचार करत आहे. त्यामुळे अनेक पेशंटला अपत्यप्राप्तीचे सुखही मिळाले आहे.

अकलूज आयव्हीएफ चे डॉ सचिन गवळी सर यांनी ”Basics of Infertility ”या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.तर डॉ सौ रेवती राणे मॅडम यांनी ” Recent Advances in the Field of Infertility ” या विषयावर अगदी सखोल असे मार्गदर्शन केले.अगदी मेट्रोसिटीमध्ये होणारे उपचार आपल्या ग्रामीण भागामध्ये होतात.हेच त्यांच्या व्याख्यान मधून दिसून आले.दोघांनीही अगदी मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल संघटनेच्या  वतीने विशेष आभार मानण्यात आले तसेच डॉ.विनोद शेटे यांनी अकलूज आयव्हीएफ सेंटरचा गेली पाच वर्षातील आढावा सादर केला.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रुपाली पराडे पाटील यांनी केले.तर सूत्रसंचालन डॉ. बाळकृष्ण नष्टे व डॉ.रुपाली धाईंजे मॅडम यांनी केले.या कार्यक्रमासाठी नातेपुते ते नेवरे येथून बहुसंखेने डॉक्टर उपस्थित होते.महिला डॉक्टर यांनी ही मोठ्या संख्येने उपस्थिती होत्या.हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी निमाचे अध्यक्ष डॉ.शिरीष रणनवरे,वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.सौ.अंजली कदम मॅडम व निमा टीम तसेच होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ. अभिजित राजे भोसले,वुमन फोरमच्या अध्यक्षा डॉ.वैष्णवी शेटे मॅडम व होमिओपॅथी टीम व  अकलूज आयव्हीएफ सेंटर यांचे विशेष योगदान लाभले.शेवटी आभार प्रदर्शन डॉ.विनोद शेटे व डॉ शिरीष रणनवरे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!